Garba With Social Distancing in Navratri 2020: यंदाच्या नवरात्रीवर कोरोना विषाणूचे सावट; सामाजिक अंतराचे भान ठेऊन अशा हटके पद्धतीने साजरा होत आहे गरबा व दांडियाचा कार्यक्रम (Watch Video)

यामध्ये सण आणि उत्सव साजरे करण्यावरही अनेक बंधने घातली गेली आहेत. गणपतीचा उत्सव असाच गेला, आता देशात ‘नवरात्री’चा (Navratri 2020) उत्सव सुरु आहे. 25 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर या उत्सवाची सांगता होईल.

Social distancing Garba (Photo Credits: Video grab)

कोरोना विषाणू (Coronavirus) काळात जवळजवळ सर्वच गोष्टी प्रभावित झाल्या आहेत. यामध्ये सण आणि उत्सव साजरे करण्यावरही अनेक बंधने घातली गेली आहेत. गणपतीचा उत्सव असाच गेला, आता देशात ‘नवरात्री’चा (Navratri 2020) उत्सव सुरु आहे. 25 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर या उत्सवाची सांगता होईल. नवरात्रीमध्ये गरबा व दांडिया (Garba and Dandiya) यांना विशेष महत्व आहे. सध्या सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करायचे असल्याने, गरबा व दांडियामध्ये नेहमीचा उत्साह दिसून येत नाहीये. मात्र नवरात्र सुरु आहे आणि गरबा-दांडिया होणारच नाही हे शक्य नाही. लोकांनी सध्याच्या काळात सर्व नियमांचे पालन करून गरबा व दांडिया खेळण्याच्या विविध पद्धत्ती शोधून काढल्या आहेत, ज्या आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर गरबा व दांडिया खेळला जातो. अनेक ठिकाणी मोठ मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र यंदा असे काहीही घडणार नाही. या सर्वांमध्येही लोकांमध्ये अमाप उत्साह आहे व अशा काळात ते हटके पद्धतीने गरबा व दांडिया खेळत आहेत. मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को कोविड सेंटरमध्ये महिला वॉर्डमधील रूग्णांनी काल, 19 ऑक्टोबर रोजी आरोग्य कर्मचार्‍यांसमवेत गरबा केला. आरोग्य कर्मचारी पीपीई किट परिधान करून सर्कलमध्ये रूग्णांसमवेत गरबा खेळले. अतिशय मनमोहक असे हे दृश्य होते. यामुळे दररोज तणावाखाली असणारे कर्मचारी व रुग्णांनाही थोडा विरंगुळा मिळाला. (हेही वाचा: कोरोना वॉर्डातील डॉक्टरांनी धरला बॉलिवूड गाण्यावर ठेका: व्हायरल व्हिडिओ पाहून हृतिक रोशन म्हणाला, 'मलाही या डान्स स्टेप्स शिकायच्या')

पीपीई किट्समध्ये नाचणारे आरोग्य कर्मचारी पाहून सूरतच्या फॅशन डिझायनिंग विद्यार्थ्यांची आठवण येते. गरबा खेळण्यासाठी विद्यार्थ्यांनी खास पीपीई किट डिझाइन केले होते. हातांनी रंगविलेल्या पोशाखात गरबा खेळत असलेल्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.

दरम्यान, सोशल मीडियामध्ये काही मजेदार व्हिडिओज देखील दिसून आले आहेत. एका व्हिडिओमध्ये गरबा खेळण्यासाठी सामाजिक अंतराचे भान ठेऊन काही सर्कल आखले आहेत व दोन लोक फक्त याच सर्कलमध्ये फिरत मेटल पाईपने दांडिया खेळत आहेत. अजून एका व्हिडिओमध्ये एका व्यक्ती चक्क ट्रेडमिलवर चालत असताना गरबा खेळत आहे.

अजून एका भन्नाट व्हिडिओमध्ये लोकांनी सामाजिक अंतराचे भान ठेवण्यासाठी एका मोठ्या दोरीला ठराविक अंतरावर स्वतःला बांधून घेतले आहे व सर्कलमध्ये ते गरबा खेळत आहेत.