Father's Day 2022 Google Doodle: बाबांचा दिवस खास करण्यासाठी गूगल चं GIF अॅनिमेशनसह डूडल!
बाबांचा दिवस खास करण्यासाठी गूगलच्या होमपेजवर आज स्पेशल डूडल झळकत आहे.
जून महिन्यातील तिसरा रविवार हा फादर्स डे (Father's Day) म्हणून साजरा केला जातो. जगभरात आज या फादर्स डे च्या निमित्ताने खास सेलिब्रेशन केले जाईल पण आघाडीचं सर्च इंजिन असलेल्या गूगलनेही बाबांचा दिवस खास करण्यासाठी स्पेशल गूगल डूडल (Google Doodle) बनवलं आहे. खास GIF गूगल डूडल वर बाप-लेकाचं बॉन्ड शेअर करतानाचे हळवे क्षण दिसत आहेत. हे देखील नक्की वाचा: Happy Father's Day 2022 Wishes In Marathi: फादर्स डे च्या शुभेच्छा WhatsApp Status , Quotes द्वारा शेअर करत खास करा बाबांचा दिवस!
फादर्स डे सेलिब्रेशनची सुरूवात अमेरिकेमधून झाली आहे. अमेरिकेत Sonora Smart Dodd यांनी फादर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली. त्यांनी हा दिवस वडीलांसाठी समर्पित केला. त्यानंतर जगभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी फादर्स डे साजरा होऊ लागला. जगभरामध्ये काही देशात फादर्स डे सेलिब्रेशनच्या त्यांच्या काही वेगळ्या तारखा देखील आहेत.
आई वडीलांचे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर उपकार असतात. त्यामधून उतराई होणं शक्य नाही पण या दिवसाच्या निमित्ताने वर्षभर कामाच्या धकाधकीमधून खास वडीलांसाठी वेळ काढणं कधीकधी राहून जातं अशावेळी आजच्या दिवशी सारी काम बाजूला ठेवून फादर्स डे निमित्त तुमच्या मनातील भावना तुमच्या वडीलांप्रती बोलून दाखवायला, व्यक्त करायला विसरू नका.