Happy Fathers Day 2022 | File Image

Father's Day Marathi Wishes 2022: जून महिन्यातील तिसरा रविवार हा फादर्स डे (Father's Day) म्हणून साजरा केला जातो. यंदा हा फादर्स डे 19 जून 2022 दिवशी साजरा केला जात आहे. आई आणि बाळाचं नात खास असतं त्यामुळे या नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या अनेक संधी असतात. पण बाप हा नेहमीच थोडा कमी गृहीत धरला जातो त्यामुळे फादर्स डे चं औचित्य साधत आपल्यासाठी कळत-नकळत झटणार्‍या या व्यक्तीचा देखील दिवस खास करायला विसरू नका. फादर्स डे 2022 चं औचित्य साधत तुमच्या वडिलांना, बाबांना, डॅडला किंवा पप्पांना मराठमोळे मेसेजेस, Wishes, Quotes, WhatsApp Status, GIFs, Greetings शेअर करत फादर्स डे च्या शुभेच्छा द्या.

अमेरिकेत Sonora Smart Dodd यांनी फादर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली. त्यांनी हा दिवस वडीलांसाठी समर्पित केला. त्यानंतर जगभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी फादर्स डे साजरा होऊ लागला. आता हे सेलिब्रेशन भारतामध्येही आलं आहे. मग आजचा दिवस वडीलांसाठी संस्मरणीय करा. नक्की वाचा: Father's Day 2022: वडिलांवरील Bollywood चे हे Songs ऐकून जुन्या आठवणी होतील ताज्या, फादर्स डे निमित्त वडिलांनाही सुंदर गाणी ऐकवून व्यक्त करा प्रेम .

फादर्स डे 2022 च्या शुभेच्छा

Happy Fathers Day 2022 | File Image

बाप हा बाप असतो,

वर पाहता  कणखर पण

मनातून तो फक्त आपला असतो

जगातील सार्‍या 'बाप' माणसांना

हॅप्पी  फादर्स डे!

Happy Fathers Day 2022 | File Image

असला खिसा रिकामा कधी

तरी  कशालाही नाही म्हणाले नाही,

माझ्या वडिलांसारखं मनाने श्रीमंत

मी दुसरं कोणालाच पाहिलं नाही.

Happy Father’s Day

Happy Fathers Day 2022 | File Image

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल

पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात

बाबा! फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

Happy Fathers Day 2022 | File Image

मुलांची सारी दु:खं तो स्वत: अबोल राहून सहन करतो

आम्ही त्या देवाच्या सजीव प्रतिमेला वडील म्हणतो

फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

Happy Fathers Day 2022 | File Image

फादर्स डे 2022 हा दिवस खास करण्यासाठी या दिवशी वेगवेगळी सेलिब्रेशन केली जातात. तुम्ही वडिलांसाठी खास जेवणाचा प्लॅन करू शकता, त्यांच्या आवडत्या गोष्टी गिफ्ट करू शकता किंवा रविवार असल्याने तुम्ही या दिवसानिमित्त एकत्र आऊटिंगला बाहेर जाऊ शकता.