Dominos, KFC , MCDonalds मधून खाणे टाळल्यास डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया बळावणार; नरेंद्र मोदी यांच्या नावे व्हायरल होणाऱ्या या Whatsapp मेसेज मागील सत्य जाणून घ्या

मात्र हा मॅसेज अधिकृत नसून यामध्ये काहीच तथ्य आढळलेले नाही

Fake Forward Message (Photo Credits: File Image)

सोशल मीडियावरून अफवा पसरू नये म्ह्णून कितीही निर्बंध लावले तरी दर दुसऱ्या दिवशी अनेकांच्या फोनवर एक ना एक फेक फॉर्वर्डेड मॅसेज येतच असतो.आश्चर्य म्हणजे या मॅसेजला कोणताही ठोस पुरावा नसला तरी अनेकजण पार डोळे झाकून पूर्ण श्रद्धेने या खोट्या बातम्या पसरवत असतात. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांच्या नावावर असाच एक नवा Whatsapp मॅसेज जोरदार फॉरवर्ड केला जात होता. प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र थॉर (Maharashtra Thor) या ग्रुपवरून हा मॅसेज शेअर केला जात होता, ज्यामध्ये केवळ एक दिवस जरी आपण केएफसी, सबवे, डॉमिनोज, पिझ्झा हट, मॅकडॉनल्ड्स सारख्या परदेशी कंपन्यांमधील खाद्यपदार्थ विकत घेणं टाळल्यास डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया बळावणार असल्याचे सांगण्यात येत होते. तसेच यामध्ये मोदींनी भारतीयांना आवाहन केल्याचे म्हणत सर्व भारतीयांनी निदान एक दिवस केवळ भारतीय पदार्थ खावेत असा संदेश देण्यात आला होता, सोबतच हा मॅसेज जास्तीत जास्त शेअर करण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते.

हा व्हायरल मॅसेज अवघ्या काहीच क्षणात अनेकांपर्यंत पोहचला होता, काहींनी तर नेहमीचं सवयीप्रमाणे आपल्या ट्विटर व अन्य सोशल मीडिया अकाऊंटवरून हा मॅसेज शेअर केला होता. Whatsapp वापरण्यासाठी प्रति महिना 499 रूपये भरावे लागणार? झपाट्याने व्हायरल होणार्‍या या मेसेजमागील जाणून घ्या सत्य!

पहा काय होता हा फॉर्वर्डेड मॅसेज

मात्र, यानंतर आम्ही संपूर्ण सोशल मीडिया तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक तसेच कार्यालयाचे सोशल मीडिया अकाउंट तपासून संबंधित मॅसेजची पडताळणी केली, यामंडई कुठेही अशा प्रकारच्या पत्रकाची नोंदी आढळली नाही, त्यामुळे हा मॅसेज केवळ एक फेक फॉरवर्ड असून यामध्ये कोन्तेहै तथ्य नाही हेच निष्पन्न होत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif