Fact Check: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या पोप यांना भेटण्यासाठी टॅक्सीतून गेले? फोटोशॉप करण्यात आलेला फोटो सोशल मीडियात व्हायरल
त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज ही निर्माण होतात. अशाच प्रकारची एक बातमी सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोप फ्रान्सिस यांना भेटण्यासाठी टॅक्सीतून गेल्याचा फोटो व्हायरल होत आहे.
Fact Check: सध्या सोशल मीडियात खुप अशा खोट्या बातम्या तुफान व्हायरल होत असतात. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज ही निर्माण होतात. अशाच प्रकारची एक बातमी सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोप फ्रान्सिस यांना भेटण्यासाठी टॅक्सीतून गेल्याचा फोटो व्हायरल होत आहे. खरंतर व्हायरल झालेला मोदी यांचा हा फोटो खोटा असल्याचे फॅक्ट चेक मधून सांगण्यात आले आहे.(Fact Check: पीएम मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली होत आहे फसवणूक, खोटे पत्र व्हायरल; जाणून घ्या सत्य)
फोटोशॉप करण्यात आलेल्या फोटोमध्ये टॅक्सीची प्लेट कारवर दिसून येत आहे. तेथेच मोदी हे फ्रान्सच्या पोप यांना भेटताना ही दिसत आहेत. काही बनावट क्रमांकाची प्लेटसह टॅक्सी प्लेट सुद्धा फोटोमध्ये जोडल्याचे व्हायरल झाले आहेत. काही लोकांना हे खरे वाटले. परंतु ANI यांनी केलेल्या ट्विटमध्ये कारवर कोणताही टॅक्सी प्लेट नसल्याचे दिसून येत आहे.
Tweet:
Tweet:
ANI ने ट्विट करत म्हटले की, पीएम मोदी यांचे पोप फ्रान्सिस यांनी स्वागत केले. या दोघांमधील भेट ही फक्त 20 मिनिटांसाठी होत. पण ती एक तास झाली. मोदी आणि पोप यांच्यामधील बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा ही झाली. त्यामुळे एखादी बातमी सोशल मीडियात शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता जाणून घ्यावी असे आवाहन वारंवार नागरिकांना केले जाते.(Fact Check: लोकांना पाठवले जात आहे रेल्वेमधील नोकरीचे बनावट ऑफर लेटर; जाणून घ्या काय आहे सत्य)
दरम्यान, पीएम मोदी यांनी शनिवारी पोप यांची भेट घेत त्यांना भारतात येण्यासाठी आमंत्रण दिले आहे. पोप फ्रान्सिस यांनी हे आमंत्रण स्विकारत असे म्हटले की, भारतीय नेत्याने हे दिलेले सर्वाधिक उत्तम गिफ्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोम मध्ये G20 समिटसाठी पोहचले आहेत. या समिटमध्ये मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यानुअल मॅक्रॉन यांची सुद्धा भेट घेतली.