Fact Check: कोविड-19 संबंधित मेसेज पोस्ट केल्यास दंडात्मक कारवाई होणार? PIB ने केला Viral WhatsApp Message चा खुलासा

कोणत्याही व्यक्तीने कोविड-19 संबंधित मेसेज पोस्ट केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

Fake Message | (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस संकटात (Coronavirus Pandemic) अनेक फेक मेसेज (Fake Message) सोशल मीडियाच्या (Social Media) विविध माध्यमातून व्हायरल होत असतात. या फेक मेसेजमुळे नागरिकांची दिशाभूल होते. त्यामुळे सोशल मीडियावरील मेसेजवर विश्वास न ठेवण्याचा आणि मेसेज फॉरवर्ड न करण्याचे आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत असते. हाच धागा पकडत आता एक नवा व्हॉट्सअॅप मेसेज (WhatsApp Message) व्हायरल होत आहे. कोणत्याही व्यक्तीने कोविड-19 संबंधित मेसेज पोस्ट केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये लिहिले की, "आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत सरकारी विभाग सोडून इतर कोणत्याही व्यक्तीने कोरोना संबंधित मेसेज पोस्ट केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. हा मेसेज सर्व ग्रुप अॅडमिनने आपल्या ग्रुपमध्ये पाठवावा." या व्हायरल मेसेज मागील सत्यता पीआयबीकडून तपासण्यात आली आहे. त्यानंतर मेसेजमधील दावा खोटा असल्याचे पीआयबीने ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

Fact Check By PIB:

(हे ही वाचा: Fact Check: टाटा हेल्थच्या नावावर 'COVID-19 Three Stages' उपचाराचा व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज पुन्हा समोर; या मॅसेजमागचे सत्य घ्या जाणून)

मागील वर्षी देखील कोरोना संसर्गाचा उद्रेक होत असताना फेक न्यूजंना उधाण आले होते. त्यानंतर आता पुन्हा संसर्ग वाढू लागल्याने चुकीच्या बातम्या पसरतील आणि नागरिकांचा प्रचंड गोंधळ उडेल. त्यामुळे पीआयबीकडून वारंवार फेक न्यूजचा खुलासा करण्यात येत असतो. तसंच चुकीच्या बातम्यांना बळी न पडता संबंधित अधिकृत संकेतस्थळावरुन माहिती मिळवा, असेही सांगण्यात येते.