Fact Check: ऑनलाईन काउंसलिंग, पदव्युत्तर जागा वाटपासंदर्भात आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र? व्हायरल झालेल्या पोस्टबाबत PIB ने केला खुलासा
मात्र अशा महासंकटाच्या वेळी सुद्धा नागरिकांची दिशाभुल करणे, सोशल मीडियात चुकीच्या बातम्या आणि माहिती पसरवणे अशा गोष्टी सर्रास सुरु आहेत.
देशभरात सध्या कोरोनाचे महासंकट उद्भवले असून सरकारकडून त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र अशा महासंकटाच्या वेळी सुद्धा नागरिकांची दिशाभुल करणे, सोशल मीडियात चुकीच्या बातम्या आणि माहिती पसरवणे अशा गोष्टी सर्रास सुरु आहेत. मात्र नागरिकांनी अशा अफवा किंवा खोट्या बातम्यांना बळी पडू नये असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. याच दरम्यान आता सोशल मीडियात एक पत्र व्हायरल होत आहे. या पत्रामधून असा दावा करण्यात आला आहे की, ऑनलाईन काउंसलिंग आणि पदव्युत्तर जागा वाटपासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.
पीआयबी महाराष्ट्र यांनी सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या पत्राबाबत अधिक खुलासा केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, हे पत्र खोटे आहे. अशा प्रकारचे कुठलेही पत्र आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेले नाही.(Fact Check: कबुतरामुळे होतो 'Hyper Sensitive Pneumonia' आजार? पनवेल शहर महानगरपालिकेचे 'ते' परिपत्रक खोटे; जाणून घ्या व्हायरल होणाऱ्या मेसेज मागील सत्य)
यापूर्वी व्हॉट्सअॅपवरील एका मेसेजमध्ये National Testing Agency (NTA)ने यंदाची NEET-UG Exam 2020 परीक्षा ऑगस्ट महिन्यात पुढे ढकलली आहे असा मॅसेज व्हायरल करण्यात आला होता. या व्हायरल मेसेजमुळे आता अनेक वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झाले होते. मात्र PIB Fact Check च्या अकाऊंटवरून हा व्हायरल मेसेज आणि त्यामधील दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान मे महिन्यात केंद्रीय मनुष्यबळ आणि मानव संसाधन मंत्री Ramesh Pokhriyal Nishank यांनी NEET 2020 Exam परीक्षा 26 जुलै दिवशी होणार असल्याचे जाहीर केले आहे.