Dated Video Shared as Muslims Licking Plates to Spread Coronavirus (Photo Credits: Facebook)

सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) भीतीखाली वावरत आहेत. आज महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 335 झाली आहे. अशात दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझ येथील कार्यक्रमात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याने सर्वत्र जणू हाहाकारच माजला आहे. त्यात सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही मुस्लीम लोक भांडी, ताट, चमचे, वाट्या अशा गोष्टी चाटताना (Muslims Licking Utensils) दिसत आहेत. हे सर्व लोक कोरोना व्हायरसचा प्रसार करण्यासाठी अशी कृती करत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ आणि कोरोना व्हायरस यांचा काहीही संबंध नाही.

अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे, ज्याखाली लिहिले आहे, ‘कोरोना विषाणूची चाचणी घेण्यासाठी बिहारमधील पोलिसांनी मशिदीत लपून बसलेल्या 14 चीनी मुस्लिमांना ताब्यात घेतले. इरोड पोलिसांनी थायलंडमधील कोरोनाची लागण झालेल्या मुस्लिमांना ताब्यात घेतले. आज सालेम पोलिसांनी मशिदीतून 11 इंडोनेशियन मुस्लिमांना अटक केली. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कसे हे कोरोना बाधित मुस्लीम लोक या विषाणूच्या प्रसारासाठी मुद्दाम भांडी, ताट, चमचे, वाट्या चाटत आहेत'. मात्र याबाबत थोडे संशोधन केल्यावर हा व्हिडिओ किती चुकीच्या प्रकारे व्हायरल होत आहे हे लक्षात येईल. (हेही वाचा: कोरोना व्हायरस संबंधित मेसेजेस, बातम्या, पोस्ट WhatsApp Groups वर शेअर करण्यास मनाई? व्हायरल होणाऱ्या या मेसेज मागील सत्य काय?)

Video depicting crazy behaviors of gullible plate, bowels, spoons licking Bohrasplate-licking Bohras 2 from Asghar Vasanwala on Vimeo.

तर हा मूळ व्हिडिओ 31 जुलै 2018 मध्ये यूट्यूबवर शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये दिसणारे लोक हे दाउदी बोहरा समाजातील लोक आहेत. या समाजातील लोकांना जेवणाचा अपव्यय करणे अजिबात चालत नाही. म्हणूनच हे लोक ते टाळण्यासाठी या प्रकारे भांडी चाटत आहेत, जेणेकरून सर्व अन्न पोटात जावे व नंतर ही भांडी घासली जातील. तर अशाप्रकारे उरलेल्या अन्नाचा अपव्यय टाळण्यासाठी बोहरा मुसलमानांनी चाटलेल्या प्लेट आणि चमच्याचा व्हीडिओ, सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेत मुस्लीम लोकांबद्दल द्वेष पसरवण्यासाठी मुद्दाम वापरला जात आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ पूर्णपणे फेक आहे.