Fact Check: MTNL KYC पुढील 24 तासांत संपणार असल्याचे ग्राहकांना खोटे मेसेज; PIB Fact Check ने केला खुलासा
अशा प्रकारचे मेसेज, कॉल किंवा इमेल आल्यास त्याला उत्तर देऊ नका असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
सोशल मीडियात सध्या इतक्या झटपट बातम्या शेअर केल्या जातात की त्यामागील सत्यता न तपासताच अनेक गोष्टी फॉरवर्ड केल्या जातात. आता सायबर क्राईमचा देखील दर वाढल्याने बनावट लिंक्स पसरवून अनेकांची फसवणूक केली जाते. आर्थिक फसवणूक केली जाते. अशामध्ये आता एमटीएनएल च्या ग्राहकांना MTNL KYC 24 तासांत एक्सपायर होणार असल्याचं सांगत ताबडतोब ते अपडेट करण्यासाठी एक लिंक दिली जाते. दरम्यान एमटीएनएल आणि पीआयबी फॅक्ट चेक दोन्ही कडून हे मेसेज फसवे असल्याचं सांगण्यात आलं आहे. एमटीएनएल अशा प्रकारचे मेसेज पाठवत नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे.
सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एमटीएनएल एसएमएस, कॉल, व्हॉट्सअॅप द्वारा टेलि व्हेरिकेशनने केवायसी करत नाही. अशा प्रकारचे मेसेज, कॉल किंवा इमेल आल्यास त्याला उत्तर देऊ नका असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
PIB Fact Check
सध्या सोशल मीडीयामध्ये एसबीआयच्या योनो अॅप वरील अकाऊंट ब्लॉक केले असल्याचे मेसेज वायरल होत आहेत. त्यामध्ये पॅनकार्ड लिंक करण्याचे मेसेज दिले आहेत. पण यादेखील खोट्या लिंक्स असल्याचं सांगण्यात आले आहे त्यामुळे अधिकृत स्त्रोत किंवा सोशल मीडीया अकाऊंट वरून माहिती मिळाली नसेल तर त्यावर विश्वास ठेवू नका.