Fact Check: मुंबई, नवी मुंबईत नागरिकांसाठी घरपोच दारुची डिलिव्हरी? फसवणूकदारांकडून येणाऱ्या खोट्या फोन कॉल्स पासून रहा सावध
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा जरी वाढत असला तरीही आर्थिक भार सांभाळण्यासाठी राज्य सरकारने दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र जशी दारुची दुकाने सुरु होणार तशी नागरिकांना भल्या मोठ्या रांगा दुकानाबाहेर लावण्यास सुरुवात केली होती. ऐवढेच नाही तर सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे ही दिसून आले.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा जरी वाढत असला तरीही आर्थिक भार सांभाळण्यासाठी राज्य सरकारने दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र जशी दारुची दुकाने सुरु होणार तशी नागरिकांना भल्या मोठ्या रांगा दुकानाबाहेर लावण्यास सुरुवात केली होती. ऐवढेच नाही तर सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे ही दिसून आले. त्यामुळे सरकारला पुन्हा दारुची दुकाने बंद करत आहोत असा निर्णय जाहीर करावा लागला आहे. मुंबईसह आणखी पाच जिल्हे म्हणजेच सोलापूर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा आणि अमरावती येथे दारुची दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. याच दरम्यान आता काही समाजकंट त्यांच्या जाळ्यात ओढून पैसे लुटण्याचा विचार करत आहेत. दारुच्या दुकानासंदर्भातील यादीत फसवणूकदार स्वत:चा क्रमांक देत नागरिकांना अर्ध्या किंमतीत दारु मिळेल असे आमीष दाखवत आहेत. मात्र यासाठी नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने पैसे भरण्यास सांगितले जात आहे. या लोकांना ग्राहकांकडून पैसे मिळाल्यानंतर त्यांच्या क्रमांक डिस्कनेक्ट केला जात असून पैसे पुन्हा मिळण्याचा कोणताच मार्ग उरत नाही आहे. तर आम्ही तुम्हाला फसवणूकदार नागरिकांना कशी प्रकारे आपल्या जाळ्यात ओढून त्यांची दारु विक्रीच्या नावाखाली फसवणूक करतात ते सांगणार आहोत.(BMC: मुंबईत दारूचे दुकान बंद; केवळ किराणा दुकाने, मेडिकल यांसारख्या जीवनाश्यक वस्तूंचे दुकाने राहणार सुरु)
बहुतांश रिपोर्ट्समधून समोर आले आहे की, दारुची ऑनलाईन पद्धतीने विक्री केली जाते. मात्र ते विश्वासार्ह नसल्याचे सांगण्यात आले आहे. फसवणूकदार खासकरुन मुंबईतील नागरिकांना टार्गेट करत आहेत. अशाच प्रकारची घटना गेल्या महिन्यात नागपूर येथे घडली असून तेथे ही घरपोच दारुची डिलिव्हरी केली जाईल अशी बातमी सर्वत्र पसरली होती. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी ती बातमी खोटी असल्याची माहिती देत नागरिकांना अशा प्रकारच्या गोष्टींना बळी पडू नये असे आवाहन केले होते.(पुणे: राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन; सामाजिक अंतर आणि सॅनिटाइजरचा वापर न केल्याप्रकरणी दारुच्या 9 दुकानांवर कारवाई)
येथे पहा फसवणूकदार तुमच्याकडून कशा प्रकारे पैसे लुटतात-
-गुगलवर असलेल्या क्रमांकावर ग्राहक प्रथम फोन करतात.
-यावर फोन उचलला जात असून ग्राहकांना दुकानदार दारुचे अर्धे पैसे भरण्यासाठी सांगतो.
-ग्राहकाने दारुचे अर्धे पैसे दिल्यानंतर तुम्हाला एक QR कोड पाठवला जात असून तो स्कॅन करुन डिलिव्हरी चार्ज भरावा लागतो. हा डिलिव्हरी चार्ज जवळजवळ 40 रुपये ग्राहकाकडून आकारला जातो.
- तुम्ही एकदा कोड स्कॅन केल्यानंतर तुमच्याकडून अधिक पैशांची मागणी केली जाते. पण ही रक्कम फक्त 40 रुपये असल्याचे ही आश्वासन दिले जाते.
-तुमच्याकडून पैसे कापले गेल्यानंतर तुम्ही जर रिफंड मागत असल्यास फोन कॉल डिस्कनेक्ट केलेला असतो.
Maharashtra Coronavirus: महाराष्ट्रात तब्बल ४८७ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण - Watch Video
त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही रक्कम भरता ती योग्य आहे की नाही ते तपासून पहा. महाराष्ट्र सरकारने जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंच्या सेवा त्यात दारुची दुकाने येत्या 4 मे पासून कन्टेंटमेंट झोन वगळून राज्यात सर्वत्र सुरु होणार असल्याचे म्हटले होते. परंतु दारुच्या दुकानाबाहेरील गर्दी पाहता निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे आता फक्त अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांसाठी सुरु राहणार आहे. याच दरम्यान, जर तुम्हाला घरपोच दारुची डिलिव्हरी करु असा फोन कॉल आल्यास त्यापासून सावध रहा असे आवाहन करण्यात येत आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 07, 2020 04:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

