Fact Check: कोरोना व्हायरसचा संसर्ग वाऱ्यामुळे होते? WHO यांनी खोट्या माहितीचे स्पष्टीकरण देत केला खुलासा

त्यामुळे सोशल मीडियात कोरोना व्हायरससंबंधित विविध माहिती देण्यात येत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात कोरोना संबंधितची एक माहिती जवळजवळ 30 हजार लोकांपर्यंत पोहचली होती. त्यामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग वाऱ्यामुळे परसत असल्याचे सांगण्यात आले होते.

Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे सोशल मीडियात कोरोना व्हायरससंबंधित विविध माहिती देण्यात येत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात कोरोना संबंधितची एक माहिती जवळजवळ 30 हजार लोकांपर्यंत पोहचली होती. त्यामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग वाऱ्यामुळे परसत असल्याचे सांगण्यात आले होते. कोरोना व्हायरस हा वाऱ्यामुळे पसरत असल्याचा मेसेज व्हॉट्सअॅपवर लोकांना आल्याने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर बहुतांश नागरिकांना कोरोना व्हायरस हा प्रवास आता केला काय की नंतर केला काय पण वाऱ्यातून पसरत असल्याच्या मेसेजवर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली होती. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) यांनी या मेसेज संबंधित अधिक खुलासा केला आहे.

WHO यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचा संसर्ग हा वाऱ्यामुळे होत नाही. तर कोविड-19 चा प्रादुर्भाव हा शिंकण्यातून होते. ज्यावेळी व्यक्तीला सर्दी, खोकला किंवा बोलण्यातून निघणाऱ्या थेंबांमुळे पसरला जातो. त्यामुळे हे थेंब वजनाने थोडे जड असल्याने ते हवेत टिकून राहू शकत नाहीत. तर ते जमिनीच्या पृष्ठभागावर पडतात. तसेच जर एखादा व्यक्ती कोरोनाबाधित रुग्णाच्या सान्निध्यात आल्यास त्याला कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता असते.

तसेच कोविड-19 ची लागण झालेल्या व्यक्तीपासून तुम्ही 1 मीटरच्या अंतरावर किंवा तेथील पृष्ठभानंतर डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श केल्यास तुम्हाला विषाणूचा संसर्ग होऊ शकतो असे डब्लूएचओ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाबाधित रुग्णांपासून 1 मीटरचे अंतर ठेवावे असे ही सांगण्यात आले आहे.(Fact Check: मुंबई पोलिसांच्या नावाने व्हायरल होणारी 'ती' Audio Clip खोटी; क्लिप शेअर न करण्याचे पोलिसांचे आवाहन)

नागरिकांनी वारंवार हात साबणाने किंवा सॅनियाटझरने स्वच्छ धुवावेत. तसेच विनाकारण नाक, तोंड किंवा डोळ्यांचे येथे स्पर्श करणे टाळावे असे ही डब्लूएचओ यांनी म्हटले आहे. देशभरात कोरोना व्हायरसमुळे 30 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर सहा लाख लोकांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. चीन नंतर आता इटली येथे कोरोना व्हायरच्या मृतांचा आकडा सर्वाधिक आहे.