Fact Check: मुंबईमध्ये संचार बंदी दरम्यान दूध, भाजीपाला, किराणा दुकानांच्या वेळेवर निर्बंधाच्या बातम्या खोट्या; मुंबई पोलिसांनी WhatsApp वर फिरणार्या अफवांबाबत केला खुलासा
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे संचारबंदीचे आदेश जाहीर केले आहे. या दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यानुसार मुंबई पोलीस आयुक्तांनी या संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी एक टाइम टेबल दिले आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) संक्रमित झालेल्या व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी सकाळी चार नवीन रुग्ण आढळले, त्यातील 3 पुण्यातील आणि एक सांगलीतील आहे. आता महाराष्ट्रात रूग्णांची संख्या 101 वर येऊन पोहचली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेल्या कलम 144 च्या अपयशानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून संपूर्ण राज्यात कर्फ्यू जाहीर केला आहे. यासह राज्यातील सर्व सीमा व शहरांच्या सीमांनाही सील ठोकण्यात आले आहे. यामुळे इतर जिल्ह्यांमधील खासगी वाहने, बस आणि इतर परिवहन सेवा वाहतुकीस परवानगी मिळणार नाही. या दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यानुसार मुंबई पोलीस आयुक्तांनी (Mumbai Police Commissioner) या संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी एक टाइम टेबल दिले आहे. या मेसेजनुसार दुध विक्रेत्यांची दुकाने सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत खुले असतील. वर्तमानपत्र विक्रेत्यांची दुकाने सकाळी 7पर्यंत. तर भाजीपाला, किराणा आणि औषधांची दुकाने सकाळी 8 ते 11 पर्यंत खुले असतील असे सांगण्यात आले आहे. (Coronavirus: महाराष्ट्र शंभरी पार, देशातही कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 503; COVID-19 संटक वाढले)
या व्हायरल होणाऱ्या मेसेजवर मुंबई पोलीस आयुक्त श्री परम बीर सिंह (Param Bir Singh) यांनी स्पष्टीकरण दिले आणि हे सर अफवा असल्याचे म्हटले. ते म्हणाले की सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या सूचना त्यांच्या दिशानिर्देशांवर बनविलेले नाही. संकटाच्या काळात आणीबाणीचे असे मेसेज पुढे पाठवण्यापूर्वी कृपया त्याची सत्यता पडताळून पाहा असे निवेदन त्यांनी केली.
संपूर्ण राज्यात संचारबंदी दरम्यान कोणतेही विशेष कारण नसताना घराबाहेर हिंडणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाईल. कर्फ्यू दरम्यान मुंबईसह राज्यभरबहुतेक सेवा सुरू राहतील. जीवनावश्यक वस्तू, औषधे, दूध, बेकरी, कृषी उद्योग, पाळीव प्राणी, खाद्यपदार्थांची दुकाने आणि दवाखाने खुली राहतील. कृषी उद्योगाशी संबंधित वाहतूकही सुरू राहील. शिवाय, खासगी वाहने केवळ अत्यावश्यक सेवेसाठी रस्त्यावर येऊ शकतील. दुसरीकडे, मागील 24 तासात मुंबई पोलिसांनी कलम 144 तोडल्याप्रकरणी 31 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.