Coronavirus Lockdown च्या काळात गोवा पोलिसांकडून नागरिकांना घाबरवून घरी बसवण्यासाठी 'भूता'चा वापर? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्यता

सोशल मीडियामध्ये एका बाईकस्वाराला भूताच्या भीतीने परतवल्याचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे.मात्र खरंच या व्हिडिओमध्ये तथ्य आहे? जाणून घ्या गोव्यातील भूताच्या व्हिडिओमागील खरं कारण काय आहे?

Goa police uses ghost to scare violators of lockdown? (Photo Credits: Video Grab)

जगभरामध्ये सध्या कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. अशात जागतिक आरोग्य संकटाचा मुकाबला करण्यासाठी सध्या सोशल डिस्टंसिंग पाळत अनेक देशांनी महिन्याभरापर्यंतचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र अशा गंभीर संकटाच्या काळामध्येही अनेक नागरिक बेजबाबदारपणे रस्त्यावर फिरत आहेत. यामध्ये केवळ भरतीयांचा नव्हे तर जगातील अनेक प्रगत देशातील नागरिकांचादेखील सहभाग आहे. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्रशासन नामी युक्ता लढवत आहे. अशामध्ये गोवा राज्यात नागरिकांना घरी बसवण्यासाठी स्थानिक पोलिस भूताची भीती दाखवत आहे अशाप्रकारचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. सोशल मीडियामध्ये एका बाईकस्वाराला भूताच्या भीतीने परतवल्याचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे.मात्र खरंच या व्हिडिओमध्ये तथ्य आहे? जाणून घ्या गोव्यातील भूताच्या व्हिडिओमागील खरं कारण काय आहे? Fact Check: रशियाचे राष्ट्राध्यक्ष Vladimir Putin यांनी रस्त्यावर 800 वाघ, सिंह सोडल्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल; काय आहे या मागील सत्यता?

सध्या व्हायरल व्हिडिओमध्ये एक माणूस संपूर्ण पांढरे कपडे घालून दिसत आहे. जशी बाईक रस्त्यावर जवळ येत आहे. तशी पांढर्‍या कपड्यामधील ही व्यक्ती त्याच्यासमोर उभी ठाकते. भूत सदृश्य प्रतिमा पाहून तो बाईकस्वार देखील यू टर्न मारत धूम ठोकतो. सध्या अशा मजेशीर व्हिडिओची सोशल मीडियावर चलती आहे. लॉकडाऊनच्या संचारबंदीचं निमित्त काढत काही जणांनी गोवा पोलिसचं ही युक्ती वापरत आहेत असा दावा केला आहे. हा व्हिडिओ मजेशीर असला तरीही तो लॉकडाऊनच्या काळात गोवा पोलिसांच्या युक्तीचा एक भाग आहे हे मात्र खोटं आहे. हा 2019 चा जुना व्हिडिओ असून आता तो पुन्हा व्हायरल होत आहे.

इथे पहा व्हिडिओ

Somewhere in Goa, police had to resort to this unique technique to deal with the violators of #Lockdown

2019 सालचा हा आहे मूळ व्हिडीओ 

 

भारतामध्ये 25 मार्च ते 14 एप्रिल असा 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. याकाळात कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत घरी बसणं अपेक्षित आहे. मात्र नागरिक रस्त्यावर फिरत असल्याने अनेकदा पोलिसांचाही संयम सुटत असल्याचं चित्र आहे. गोव्यामध्येही क्षुल्लक कारणांसाठी नागरिक बाहेर फिरत असल्याने मुख्यमंत्र्याचा पारा चढलेला पहायला मिळालं आहे. दरम्यान हा लॉकडाऊनचा काळ कठीण असला तरी यावेळेचा सदुपयोग करत सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे. सोशल मीडिया, इंटरनेट यावरच अनेकांचा बराचसा वेळ जात आहे. त्यामुळे खोट्या बातम्या, अफवा यांच्यापासून दूर राहणं, त्या न पसरवणं हे देखील सामाजिक भान जपणं आवश्यक आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 1100 च्या वर पोहचला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now