Fact Check: 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजने' अंतर्गत केंद्र सरकार सर्व महिलांच्या खात्यात जमा करणार 2 लाख 20 हजार रुपये? PIB ने सांगितले Viral Youtube Video मागील सत्य
कोविड-19 संकटात फेक न्यूज व्हायरल होण्याचे प्रमाण अधिकच वाढले. आता यात अजून एका बातमीची भर पडली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फेक न्यूजचे (Fake News) प्रस्थ कमी होण्याचे नावच घेत नाही. कोविड-19 (Covid-19) संकटात फेक न्यूज व्हायरल होण्याचे प्रमाण अधिकच वाढले. आता यात अजून एका बातमीची भर पडली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात पंतप्रधान नारी शक्ती योजनेअंतर्गत (Pradhanmantri Nari Shakti Yojana) केंद्र सरकार (Central Government) सर्व महिलांच्या खात्यात 2 लाख 20 हजार रुपये जमा करणार, असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या नावाने व्हायरल होणाऱ्या या बातमी मागील तथ्यता पीआयबी फॅक्ट चेक कडून करण्यात आली आहे.
पंतप्रधान नारी शक्ती योजनेअंतर्गत केंद्र सरकार सर्व महिलांच्या खात्यात 2 लाख 20 हजार रुपये जमा करणार, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या युट्युब व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. पीआयबी फॅक्ट चेकने या व्हिडिओमागील सत्यता तपासली असून हा व्हिडिओ फेक असल्याचे म्हटले आहे. तसंच केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नसल्याचेही PIB ने स्पष्ट केले आहे.
दावा: पंतप्रधान नारी शक्ती योजनेअंतर्गत केंद्र सरकार सर्व महिलांच्या खात्यात 2 लाख 20 हजार रुपये जमा होणार.
सत्य: हा व्हिडिओ मेसेज फेक आहे. केंद्र सरकारची अशा प्रकारची कोणतीही योजना नाही.
Fact Check By PIB:
प्रधानमंत्री जन सम्मान योजनेअंतर्गत सर्व खात्यात 90 हजार रुपये जमा होणार असा दावा करणारा फेक मेसेज व्हायरल होत होता. तर दुसऱ्या एका व्हायरल मेसेजमध्ये महात्मा गांधी बेरोजगार योजनेअंतर्गत केंद्र सरकार Work From Home द्वारे रोजगाराची संधी देत असल्याचा दावा करण्यात आला होता. अशा प्रकारचे अनेक खोटे, दिशाभूल करणारे मेसेजेस वेगाने व्हायरल होत असून त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. अशा प्रकारच्या मेसेजेवर विश्वास न ठेवून ते फॉरवर्ड न करणे हा त्यावर नियंत्रण मिळवण्याचा एकच उपाय आहे.