E-Visa and Passport For Kailasa: स्वामी नित्यानंदने सुरु केली हिंदू बेट 'कैलासा'साठी ई-व्हिसा, पासपोर्ट प्रक्रिया; जाणून घ्या कुठे कराल अप्लाय
याविषयी अधिक जाणून घेण्यापूर्वी किंवा या गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी हे धान्यात घ्या की, कैलासा हे स्वामी नित्यानंद याचे स्वयं-घोषित हिंदू बेट आहे. इतकेच नव्हे तर स्वामी नित्यानंद हा स्वयंचलित गॉडमॅन देखील आहे
गेले काही महिने स्वयंभू बाबा नित्यानंद (Nithyananda) हा भारतामधून फरार आहे. इकडे पोलीस त्याचा शोध घेत असताना नित्यानंदने चक्क कैलास (Kailaasa) नावाचा स्वतःचा नवीन देश स्थापन केला असल्याची माहिती मिळाली होती. आता नित्यानंदने अखेर कैलासासाठी ई-व्हिसा (E-Visa) आणि पासपोर्ट Passport प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी त्याने एक व्हिडिओही जारी केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. हा नवीन देश ऑस्ट्रेलियाजवळ असल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यापूर्वी किंवा या गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी हे धान्यात घ्या की, कैलासा हे स्वामी नित्यानंद याचे स्वयं-घोषित हिंदू बेट आहे. इतकेच नव्हे तर स्वामी नित्यानंद हा स्वयंचलित गॉडमॅन देखील आहे.
हा व्हिडिओ पाहून असा अंदाज वर्तविला जात आहे की कैलासा ऑस्ट्रेलियाच्या आसपास आहे. मात्र हे ठिकाण नक्की कोठे आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. व्हिडिओमध्ये नित्यानंदने म्हटले आहे की, कैलासाला जाण्यासाठी तुम्हाला स्वखर्चाने ऑस्ट्रेलियाला यावे लागेल, तेथून तुम्हाला कैलासाच्या चार्टर्ड विमानाने, ज्याचे नाव गरुडा असेल कैलासा येथे नेण्यात येणार आहे. कैलासासाठी तुम्हाला फक्त तीन दिवसांचाच व्हिसा मिळणार आहे व या तीन दिवसांमध्ये तुम्हाला फक्त एकदाच दर्शन घेण्याची परवानगी असेल.
या ठिकाणी राहण्याचा व जेवणाचा खर्च कैलासा सरकार करणार आहे. तसेच या सर्व प्रक्रियेमध्ये कुठेही पैशांचा हस्तक्षेप नसेल. म्हणजेच तुमचा ऑस्ट्रेलिया ते कैलासा व परत ऑस्ट्रेलिया अशा प्रवासाचा खर्चही कैलासा सरकार करणार आहे. जर तुम्हालाही कैलासासाठी व्हिसा किंवा पासपोर्टसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला shrikailasa.org/e-passport या ठिकाणी भेट द्यावी लागेल. (हेही वाचा: फरार नित्यानंद याच्या 'कैलास' देशात जाण्यासाठी रविचंद्रन अश्विन याने विचारला व्हिसा मिळवण्याचा मार्ग, Netizens नी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया)
दरम्यान, वेबसाइटनुसार, फरार स्वयंभू बाबा नित्यानंद याने 'हिंदू सार्वभौम राष्ट्रा’ची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर, त्याच्याकडे तथाकथित ‘कैलास; देशाचे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळही आहे. या हिंदू राष्ट्राचा स्वतःचा ध्वज आहे, ज्याला ‘ऋषभ ध्वज' म्हणून ओळखले जाते.