Dog Attack in Ahmedabad: अहमदाबादमध्ये 3 महिन्यांच्या बाळावर कुत्र्यांचा हल्ला; पाळण्यातून ओढून नेऊन घेतला चावा; घटना CCTV मध्ये कैद

कुत्र्यांच्या टोळक्याने झुल्यात झोपलेल्या तीन महिन्यांच्या बाळाला ओढून नेले आणि त्याच्यावर हल्ला केला. मुलाचे आई-वडील जवळच काम करत होते. आवाज ऐकून पालक व इतर लोक तेथे पोहोचले असता एक कुत्रा मुलाला तोंडात धरून पळत आला.

Dog Attack in Ahmedabad: अहमदाबादमध्ये 3 महिन्यांच्या बाळावर कुत्र्यांचा हल्ला; पाळण्यातून ओढून नेऊन घेतला चावा; घटना CCTV मध्ये कैद
Dog Attack On 3 Month Old Baby (PC - Twitter)

Dog Attack in Ahmedabad: भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा एक हृदयद्रावक व्हिडिओ अहमदाबादमधून समोर आला आहे. येथे कुत्र्यांच्या टोळक्याने झुल्यात झोपलेल्या तीन महिन्यांच्या बाळाला ओढून नेले आणि त्याच्यावर हल्ला केला. मुलाचे आई-वडील जवळच काम करत होते. आवाज ऐकून पालक व इतर लोक तेथे पोहोचले असता एक कुत्रा मुलाला तोंडात धरून पळत आला. हे पाहून स्थानिक लोकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. लोकांनी कुत्र्याच्या तावडीतून बाळाची सुटका केली. मुलाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली, ज्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. (हेही वाचा - Pitbull Dog माणसाच्या प्रायव्हेट पार्टला चावला, रागाच्या भरात लोकांची त्याला बेदम मारहाण)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 22, 2023 01:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).