Dog Vs Snake Viral Video: घराबाहेर फिरत असलेल्या कुत्र्याचा विशालकाय सापासोबत सामना, वाचा नेमके काय घडले (Viral Video)

कुत्र्याला सर्वाधिक विश्वासू प्राणी असल्याचे म्हटले जाते. आपल्या मालकाच्या घराची सुरक्षा करण्यासह आपल्या जीवाची बाजी सुद्धा लावण्यास कुत्रे मागेपुढे पाहत नाहीत.

Dog Vs Snake Viral Video: घराबाहेर फिरत असलेल्या कुत्र्याचा विशालकाय सापासोबत सामना, वाचा नेमके काय घडले (Viral Video)
Dog Vs Snake Viral Video (Photo Credits-YouTube)

Dog Vs Snake Viral Video: कुत्र्याला सर्वाधिक विश्वासू प्राणी असल्याचे म्हटले जाते. आपल्या मालकाच्या घराची सुरक्षा करण्यासह आपल्या जीवाची बाजी सुद्धा लावण्यास कुत्रे मागेपुढे पाहत नाहीत. विश्वासू कुत्र्याचे काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. अशातच आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात घराबाहेर फिरणाऱ्या कुत्र्याचा एका विशालकाय सापासोबत सामना झाला. त्यानंतर जे काही झाले ते पाहून तुमच्या डोळ्यांवर ही विश्वास बसणार नाही.

World Of Wildlife and Village यांनी युट्युबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये असे दिसून येते की, घरातील गार्डन परिसरात एक साप फिरत आहे. तेव्हाच एक पाळीव कुत्रा सुद्धा येतो. तर घरातील मंडळींना नुकसान पोहचवण्यापूर्वीच कुत्रा त्याच्यावर हल्ला करतो.(Viral Video of Donkey: गाढव प्रेम पाहिलंत का? गाढवाला कडेवर घेतले, त्याच्यासाठी अंगाई गीत गायले; 'ऐकावे ते नवलच' वाटावे असा हा व्हिडिओ)

कुत्र्याला आक्रमक झालेले पाहून साप सुद्धा खवळतो आणि तो ही त्याच्यावर हल्ला करतो. व्हिडिओमध्ये पाहता येईल की, साप हवेत उड्या घेत कुत्र्यावर  हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. या दोघांमधील सामना काही वेळ सुरु राहतो आणि नंतर कुत्रा पुन्हा एकदा त्याच्यावर हल्ला करतो. अखेर कुत्रा सापाचा जीव घेतल्यानंतरच शांत राहतो.

(The above story first appeared on LatestLY on Oct 09, 2021 12:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).