Viral Video: डॉक्टरांनी महिलेच्या डोळ्यातून काढले 23 कॉन्टॅक्ट लेन्स; व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

कॅटरिना कुर्तिवाने 13 सप्टेंबरला हा व्हिडिओ पोस्ट केला होता, जो आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये क्टर रुग्णाच्या डोळ्यातून एकामागून एक लेन्स कसे काढत आहेत, हे दिसत आहे.

Contact lenses Viral Video (PC- Instagram)

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक डॉक्टर महिलेच्या डोळ्यांमधून अनेक कॉन्टॅक्ट लेन्स काढताना दिसत आहे. कॅलिफोर्नियातील एका डॉक्टरने एका महिलेच्या डोळ्यात अडकलेल्या 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढल्या. ही महिला रोज रात्री लेन्स काढायला विसरत असे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन लेन्स घालत असे. डॉक्टरांनी या महिलेचा व्हिडिओ आणि फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

डॉ. कॅटरिना कुर्तिवाने 13 सप्टेंबरला हा व्हिडिओ पोस्ट केला होता, जो आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर रुग्णाच्या डोळ्यातून एकामागून एक लेन्स कसे काढत आहेत, हे दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना डॉक्टरांनी लिहिले की, "एका व्यक्तीच्या डोळ्यांमधून 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढल्या आहेत. हा माझ्या क्लिनिकचा वास्तविक जीवनातील व्हिडिओ आहे. कधीही लेन्स लावून झोपू नका. रात्री झोपण्यापूर्वी कॉन्टॅक्ट लेन्स काढून दुसर्‍या दिवशी सकाळी नवे घालायला विसरण्याची ही खूप दुर्मिळ घटना आहे. तेही सलग 23 दिवस!" (हेही वाचा - Viral Video: लिफ्टमधून रुग्णास नेताना लिफ्ट अचानक खाली आली आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ophthalmologist | Dr. Katerina Kurteeva M.D. | Newport Beach (@california_eye_associates)

डॉक्टरांनी पुढे लिहिले आहे की, "हे लेन्स वेगळे करण्यासाठी मला ज्वेलर्सद्वारे वापरलेले साधन वापरावे लागले. या लेन्स महिनाभर पापणीच्या आत होत्या, त्यामुळे ते अडकले. लेन्सच्या रंगाचे स्पष्टीकरण देताना डॉक्टर म्हणाले, "अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्स आधीपासून थोड्याशा निळ्या रंगाने येतात. मी ते काढण्यासाठी फ्लोरेक्स नावाचा विशेष रंग वापरला, त्यामुळे ते निळ्याऐवजी हिरवे दिसत आहेत."