Death Video Viral: वरातीत नाचताना काळाचा घाला; वऱ्हाडींच्या समोर तरुणाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल
Varat Dance Video: अचानक मृत्यू होण्याचे प्रमाण कोरोना काळानंतर वाढल्याच्या घटना पुढे येत आहेत. कधी पोहताना, वाहन चालवताना तर कधी नाचताना अशा घटना अनेकदा घडतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Death Video Vira) झाला आहे. ज्यात एक तरुण मित्राच्या वरातीत नाचानाच खाली कोसळतो आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो.
Varat Dance Video: अचानक मृत्यू होण्याचे प्रमाण कोरोना काळानंतर वाढल्याच्या घटना पुढे येत आहेत. कधी पोहताना, वाहन चालवताना तर कधी नाचताना अशा घटना अनेकदा घडतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Death Video Vira) झाला आहे. ज्यात एक तरुण मित्राच्या वरातीत नाचानाच खाली कोसळतो आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो. लेटेस्टली मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही. पण या व्हिडिओतील दृश्य आपणास विचलीत करु शकतो. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, तरुणासोबत जे काही घडते. ज्यामुळे क्षणात होत्याचे नव्हते होते.
व्हायरल व्हिडिओ मध्य प्रदेश राज्यातील रीवा येथील असल्याचे समजते. दावा केला जात आहे की, मित्राच्या लग्नाच्या वरातीत नाचताना तरुणाला मृत्यू आला. व्हिडिओत पाहायला मिळते की, एक कोणतातरी समारंभ (बहुदा लग्नाची वरात) सुरु आहे. या समारंभात ढोल, ताशांच्या गजरात मोठ्या आवाजात संगीत वाजते आहे. या संगिताच्या ठेक्यावर उपस्थित मंडळी नाचत आहेत. यात काही तरुणांचाही समावेश आहे. नाचणाऱ्या तरुणांनी डोक्याला फेटाही गुंडल्याचे पाहायला मिळतो आहे. अशाच या आनंदाच्या क्षणी एक तरुन बेभान होऊन नाचत आहे. दरम्यान, नाचता नाचता अचानकच हा तरुण खाली कोसळतो. हा तरुण कोसळल्याचे प्रथमदर्शनी कोणाच्या लक्षात येत नाही. मात्र, सोबत नाचणाऱ्या एका तरुणाचे लक्ष जाते आणि तो त्याला उठविण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तो तरुण उठत नसल्याचे पाहायला मिळते. तरुणाला तातडीने संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात येते. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. (हेही वाचा, लग्नाच्या वराती मध्ये नाचता-नाचता स्टंट करताना कोसळला वृद्ध; जागीच मृत्यू)
ट्विट
मध्य प्रदेश के रीवा में डांस करते वक्त शख्स की मौत, UP के कानपुर से दोस्त के बरात में शामिल होने रीवा आया था मृतक अभय सचान। #ViralVideo #Health #HeartAttack #rewa #रीवा pic.twitter.com/NkGI5X8OIN
— Rakesh kumar patel (@NanheRakesh) January 18, 2023
हृदयविकाराचा तीव्र झटका नाचताना आल्याने तरुणाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जातो आहे. घडल्या प्रकारामुळे सर्वच आनंदावर वीज कोसळावी तशी शांतता पसरली. घटनेमुंळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण समजू शकेल असे डॉक्टर म्हणाले.
(The above story first appeared on LatestLY on Jan 19, 2023 01:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

