नाशिक येथे लॉकडाउनच्या काळात मेरी कॉलनीत मोरांचा मुक्त वावर, पहा व्हिडिओ
या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरस होत आहे. यापूर्वी सुद्धा मुंबईतील परिसरात मोर दिसून आल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करण्यात आले होते.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातल्याने सरकारने लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवनागी नाही आहे. फक्त अत्यावश्यक सेवासुविधांसाठी नागरिक घराबाहेर पडू शकतात. लॉकडाउनमुळे लोक घरात अडकून पडली असली तरीही बाहेर प्राणी आणि पक्षांचा मुक्त वावर रस्त्यावर दिसून येत आहे. याच पार्श्वभुमीवर नाशिक (Nashik) येथील मेरी कॉलनीत मोरांचा मुक्त वावर असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरस होत आहे. यापूर्वी सुद्धा मुंबईतील परिसरात मोर दिसून आल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करण्यात आले होते.
मेरी कॉलनीत नागरिकांचा कमी आणि मोरांचा मुक्त वावर दिसून आला आहे. याचा व्हिडिओ एएनआय यांनी ट्वीट करत पोस्ट केला आहे. मोर एका झाडावरुन खाली उतरुन आजूबाजूच्या परिसरात फिरत असल्याचे दिसून येत आहे.(Janata Curfew निमित्त सोशल मीडियावर मेसेजसह WhatsApp Stickers, Images चा पाऊस; घरीच सुरक्षित राहत Coronavirus Chain मोडण्यास मदत करण्याचं आवाहन)
दरम्यान, मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथे समुद्रात डॉल्फिन दिसल्याचा व्हिडिओ पहायला मिळाला होता. मरिन ड्राइव्ह येथे अन्य वेळी ऐवढी नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून येते मात्र जनता कर्फ्यूमुळे येथे एक ही नागरिक दिसून आला नाही. पण डॉल्फिन दिसल्याने लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियात व्यक्त केल्या होत्या. तसेच माकडांच्या पूल पार्टी किंवा पतंग उडवण्याचे व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल झाले आहेत.