Sex on Boys Trip: 'बॉईज ट्रीप'वर गेलेल्या बॉयफ्रेंडच्या फोटोत दिसला Condom; जोडीदार फसवत असल्याचे लक्षात येताच महिलेने उचलले टोकाचे पाऊल

पेट्राने व्हिडीओसोबत सांगितले आहे की, हा तोच फोटो आहे जो बॉईज ट्रीपवर असताना माझ्या एक्सच्या मित्राने मला पाठवला होता.’ हा फोटो पाहिल्यानंतर पेट्राने ब्रेकअप केले

Condom | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

प्रेम आणि विश्वास यांच्यावरच नातेसंबंध (Relationship) बनतात आणि ते टिकतातही. रिलेशनशिपमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारावर इतका विश्वास ठेवणे गरजेचे आहे की, जोडीदार तुमच्या पाठीमागे तुम्हाला फसवत असेल याची चिंता न करता दोघेही आपापले जीवन जगू शकले पाहिजेत किंवा स्वतंत्रपणे आपापल्या मित्रांसोबत वेळ व्यतीत करू शकेल पाहिजेत. परंतु TikTok वरील एका महिलेला असा विश्वास आपल्या जोडीदारावर टाकणे अंगाशी आले आहे. प्रियकराच्या मित्राने त्यांच्या सुट्टीच्या पाठवलेल्या फोटोवरून बॉयफ्रेंड आपली फसवणूक करत असल्याचे या महिलेच्या लक्षात आले.

TikTok आणि Instagram या दोन्हीवर @pets.hendrikse या नावाने खाते चालवणाऱ्या, पेट्राने बॉयफ्रेंडचा खरा चेहरा उघड करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने एक फोटो दाखवला आहे. तिचा बॉयफ्रेंड मस्तपैकी बेडवर पडलेला यामध्ये दिसत आहे. हाच फोटो बॉयफ्रेंडच्या मित्राने पेट्राला पाठवला होता. परंतु फोटो निरखून पहिला असता त्यामध्ये अशी एक गोष्ट आढळली जी पाहून पेट्रा भडकली व तिच्या लक्षात आले की, बॉयफ्रेंड आपल्याला फसवत आहे. बॉयफ्रेंड जिथे झोपला होता त्याच्या बाजूला एक उघडा कंडोम (Condom) पेट्राला दिसला होता.

तर पेट्राने दिलेल्या माहितीनुसार, तिचा बॉयफ्रेंड आपल्या पुरुष मित्रांसोबत दुसऱ्या देशात ‘बॉईज ट्रीप’वर गेला होता. दोन्ही देशातील वेळेच्या फरकामुळे जवळजवळ 12-13 तास पेट्रा व तिच्या बॉयफ्रेंडचे काही बोलणे झाले नाही. त्यानंतर तिने मेसेजस केले परंतु त्यालाही काही प्रत्युत्तर मिळाले नाही. शेवटी पेट्राने बॉयफ्रेंडच्या मित्राकडे, ‘सर्वजण ठीक आहात ना?’ अशी विचारणा केली. त्यानंतर या मित्राने पेट्राला तिच्या बॉयफ्रेंडचा बेडवर झोपलेला हा फोटो पाठवला. (हेही वाचा: सेक्सी ट्युशन टीचरसोबत विद्यार्थ्याचे शारीरिक संबंध; शिकवण्याच्या बहाण्याने बेडरूममध्ये अश्लील चाळे)

पेट्राने व्हिडीओसोबत सांगितले आहे की, हा तोच फोटो आहे जो बॉईज ट्रीपवर असताना माझ्या एक्सच्या मित्राने मला पाठवला होता.’ हा फोटो पाहिल्यानंतर पेट्राने ब्रेकअप केले. हा व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल झाला असून, तो आतापर्यंत 15 मिलिअनहून अधिक लोकांनी पहिला आहे.