COVID वुहान च्या लॅब मध्ये बनवल्याचा दावा करणाऱ्या चीनी विरोलॉजिस्ट यांचे ट्वीटर अकाउंट सस्पेंड
चीनी विरोलॉजीस्ट डी. ली-मेंग यान (Dr Li-Meng Yan) यांनी गेल्या आठवड्यात चीनवर एक आरोप लावला होता. त्यांनी असे म्हटले होते की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य काळजी घेतली गेली नाही. तसेच विज्ञानातील पुराव्यांच्याह असा दावा केला आहे की, COVID19 वुहानच्या लॅबमध्ये तयार करण्यात आला आहे. एका आठवड्याहून कमी दिवसात ट्वीटर अकाउंट कंपनीने ट्विटर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप लावत सस्पेंड केले आहे.(To All The Coronavirus Helpers Thank You: धन्यवाद कोरोना व्हायरस मदतनीस म्हणत Google चे खास Doodle; डॉक्टर, सफाई कर्मचार्यांंचे मानले आभार)
विरोलॉजिस्टने सोशल मीडियात असा दावा केला आहे की, SARS CoV-2 वुहानच्या लॅबमध्ये बनवला आहे. या दाव्यामुळे यान यांच्या फॉलोअर्स आणि लाइक्समध्ये प्रचंड वाढ झाली. डॉ. यान यांनी एका शो मध्ये खुलासा केला की, जेव्हा जगाला कोरोना व्हायरस सारख्या महासंकटापासूनच सतर्क करायचे होते त्यावेळी चीनी अधिकाऱ्यांनी धमक्या दिल्या. त्यामुळे स्वत:च्या सुरक्षिततेसाठी अमेरिकेत पळ काढावा लागला होता. त्याचसोबत चीनी अधिकाऱ्यांनी त्यांच्यासंबंधित अफवा पसवरणे आणि तिची सर्व माहिती डिलीट करण्यासाठी काही लोकांची नियुक्ती केल्याचा सुद्धा आरोप लावला होता.
यान असा ही दावा केला की, वुहान मध्ये न्युमोनियाच्या प्रादुर्भावाचा तपास करण्यास गेली असता त्यांनी कोरोनाची सुद्धा माहिती मिळवली. त्यांनी अधिकाऱ्यांना सतर्क करण्याचे सु्द्धा प्रयत्न केले. पण WHO यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यांनी चीनी अधिकाऱ्यांनी त्यांच्या चेतावणीकडे दुर्लक्ष आणि महासंकटाच्या माध्यमातून जगाला पीडित करण्याचा आरोप लावला. परंतु यापासून बचाव करता आला असता.(Fact Check: 25 सप्टेंबर पासून पुन्हा देशव्यापी लॉकडाऊन लागू होणार? PIB ने केला व्हायरल मेसेजचा खुलासा)
डॉ. ली-मेंग यान यांनी त्यांच्या व्हिडिओत असा दावा केली आहे की, हा व्हायरस नैसर्गिक नाही आहे. त्याचसोबत जीनोम अनुक्रम (genome sequence) मानव फिंगर प्रिंट सारखा आहे. याचा आधारावर तुम्ही या गोष्टी तपासून पाहू शकता. मी पुराव्यासह लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, तो चीनच्या लॅबमधून का आला आहे? यांनीच तो बनवला आहे.