Fact Check: केंद्र सरकार 15 ऑक्टोबर पासून शाळा-कॉलेज सुरु करणार नाही? PIB ने सांगितले व्हायरल पोस्ट मागील सत्य
केंद्र सरकारने शाळा-कॉलेज सुरु करण्यासंदर्भातील आपला निर्णय बदलला असून 15 ऑक्टोबर पासून शाळा आणि कॉलेज सुरु होणार नाही, असा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियाच्या विविध माध्यमात फिरत आहे.
केंद्र सरकारने (Central Government) शाळा-कॉलेज (School-Colleges) सुरु करण्यासंदर्भातील आपला निर्णय बदलला असून 15 ऑक्टोबर पासून शाळा आणि कॉलेज सुरु होणार नाही, असा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियाच्या विविध माध्यमात फिरत आहे. यापूर्वी अनलॉक 5 (Unlock 5) च्या अंतर्गत शाळा-कॉलेजेस सुरु करण्यात येणार होते. मात्र केंद्र सरकारने आपला आता निर्णय बदलला आहे. एका टीव्ही चॅनलचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात असा दावा करण्यात आला आहे. या व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या व्हायरल होणाऱ्या मेसेजमागील सत्य पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) तपासले असून ही पोस्ट फेक (Fake) असल्याचे पीआयबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसंच शिक्षण मंत्रालयाकडून अलिकडेच शाळा सुरु करण्यासंबंधित नियमावली जारी करण्यात आल्याचे पीआयबीने म्हटले आहे. 30 सप्टेंबर रोजी शिक्षण मंत्रालायकडून जारी करण्यात आलेल्या नियमांनुसार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 15 ऑक्टोबर नंतर परिसरातील परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा, शैक्षणिक संस्था सुरु करण्यात येणार आहेत.
Fact Check By PIB:
शाळा सुरु करण्यासंबंधित काही अटी आणि शर्थी केंद्र सरकारकडून लागू करण्यात आल्या आहेत. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सोशल डिस्टसिंगचे पालन करणे. राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेश या नियमावलीच्या आधारे परिसरातील परिस्थितीनुसार शाळा सुरु करण्याचा निर्णय घेऊ शकतात आणि नियमांमध्ये काही बदलही करु शकतात. (Fact Check: महात्मा गांधी बेरोजगार योजनेअंतर्गत केंद्र सरकार देत आहे Work From Home द्वारे रोजगाराची संधी? जाणून घ्या सत्य)
दरम्यान, कोविड-19 संकट काळात अनेक खोट्या बातम्या वेगाने पसरु लागल्या. यामुळे नागरिकांच्या अस्वस्थेत भर पडू लागली, गोंधळ उडू लागला. मात्र कोणत्याही मेसेजची सत्यता तपासल्याशिवाय त्यावर विश्वास न ठेवणे ही आता गरज बनली आहे.