IPL Auction 2025 Live

Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात एका म्हशीने 2 डोके आणि 6 पाय असलेल्या रेडकूला दिला जन्म

निसर्गाचे हे चमत्कार खरेच आश्चर्यचकित करणारे असतात. याला विज्ञानातही तोड नाही.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

आपण जरी विज्ञानाच्या आधुनिक काळात जगत असलो तरी, काही चमत्कारांपुढे आपल्याला नतमस्तक व्हावेच लागते. निसर्गाचे हे चमत्कार खरेच आश्चर्यचकित करणारे असतात. याला विज्ञानातही तोड नाही. आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) कृष्णा जिल्ह्यातील (Krishna) पमारू (Pamarru) गावात असाच काही चमत्कार घडला आहे. एका म्हशीने (Buffalo) दोन तोंड आणि 8 पायाच्या रेडकूला (Calf) जन्म दिला आहे. परंतु, प्रसूतीनंतर काही क्षणातच या रेडकूचा मृत्यू झाला आहे. मात्र, यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यादवपुरम गावातील कृपाल कृष्ण नावाच्या शेतकऱ्याकडे एक म्हैस आहे. ही म्हैस गर्भवती होती. मात्र, गर्भधारणेचा कालावधी पूर्ण केल्यानंतरही या म्हशीने रेडकूला जन्म दिला नाही. यामुळे गोपाल आपल्या म्हशीला पामरू येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी या म्हशीची सी सेक्शन केले. म्हशीच्या पोटातील रेडकू चुकीच्या जागेवर गेल्यामुळे सी सेक्शन करावे लागले, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने माहिती दिली आहे. हे देखील वाचा- MP Girl Suicide Viral Video: बेरोजगार तरूणीचा रेल्वे ट्रॅकवर आत्महत्येचा प्रयत्न, सतर्क रिक्षाचालकामुळे वाचला जीव; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानांकडून 'हे' आवाहन

याआधीही पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात अशीच एक घटना घडली होती. बनगाव घाटातील बावड गावात एका बकरीने चक्क आठ पायाच्या कोकरूला जन्म दिल आहे. लोकांना या कोकरूची माहिती मिळताच सर्वजण चकित झाले आणि ते पाहण्यासाठी गर्दी करण्यास सुरवात केली होती. मात्र, या कोकरूचाही जन्मानंतर काही क्षणातच मृत्यू झाला होता.