IPL Auction 2025 Live

Black Heron Viral Video: काळ्या बगळ्याने चतुराईने लावले मासेमारीसाठी जाळे; व्हायरल व्हिडिओमधील त्याची अटकल पाहून तुम्हीही व्हाल थक्क, Watch

ज्यामध्ये काळ्या बगळ्याने पाण्यात मासेमारीसाठी (Fishing) अनोखी पद्धत अवलंबली आहे. माशांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी बगळा अतिशय हुशारीने जाळे लावतो.

काळा बगळा (Photo Credits: Instagram)

Black Heron Viral Video: मांसाहारी प्राणी आणि पक्षी अनेकदा पोट भरण्यासाठी इतर प्राण्यांची शिकार करतात. तर शिकार करणारे प्राणी देखील या भक्षकांपासून दूर राहण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. शिकारी प्राण्यांना शिकार करण्यासाठी धूर्त आणि प्रभावी पद्धतीचा अवलंब करावा लागतो. सध्या सोशल मीडियावर काळ्या बगळ्याचा (Black Heron) एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये काळ्या बगळ्याने पाण्यात मासेमारीसाठी (Fishing) अनोखी पद्धत अवलंबली आहे. माशांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी बगळा अतिशय हुशारीने जाळे लावतो. बगळ्याची शिकार करण्याची अटकल पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर amit_8_edits नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. यासोबत कॅप्शन लिहिलं आहे, मासेमारीचा मस्त मार्ग. माशांना सावलीत पोहायला आवडते. म्हणून बगळा पंख पसरवतो. त्यामुळे मासे त्याखाली पोहतात आणि पकडले जातात, अशी माहिती या व्हिडिओद्वारे देण्यात आली आहे. (हेही वाचा - Viral Video: टोरंटोमध्ये रेल्वे ट्रॅकवर धावत होते दोन मुलं; अचानक मागून आली वेगवान ट्रेन, पुढे काय झालं? तुम्हीचं पहा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ)

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝙐𝙣𝙪𝙨𝙪𝙖𝙡 • 𝙈𝙚𝙢𝙚 • 𝘾𝙡𝙞𝙥𝙨 (@amit_8_edits)

सोशल मीडिया यूजर्स हा व्हिडिओ पुन्हा-पुन्हा पाहत असून आतापर्यंत या व्हिडिओला 1,706,126 लाईक्स मिळाले आहेत. मासेमारीसाठी काळ्या बगळ्याची हुशारी पाहून सर्वांनाचं आश्चर्य वाटलं आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक काळा बगळा तलावात हळू-हळू फिरत आहे. मासे पकडण्यासाठी तो पाण्याकडे पाहून सर्व बाजूंनी पंख पसरवून मासे शोधत आहे.