Viral Video: पक्षाने चोचीत पकडला विषारी साप; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप, Watch
Bird Catches Snake in Beak (PC - Instagram)

Viral Video: सोशल मीडियावर प्राण्याचे विविध स्वरुपाचे व्हिडिओ पाहायला मिळतात. यात काही प्राणी आपले भक्ष कसे पकडता हे पाहायला मिळतं. तर काही व्हिडिओमध्ये प्राण्यांमधील झुंज पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एका पक्षाचा आणि सापाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पांढऱ्या रंगाच्या पक्षाने विषारी सापाला आपल्या चोचीत पकडले आहे. हा व्हिडिओ पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. या पक्षाने या सापाची शिकार केली आहे.

आपण आतापर्यंत पक्षांना लहान किटकांची शिकार करताना पाहिलं असेल. मात्र, या पक्षाने आपल्या चोचीत पकडून चक्क सापाची शिकार केली आहे. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये, एक मोठी चोच असलेला पक्षी दिसत आहे. ज्याने आपल्या चोचीत एक मोठा साप पकडला आहे. हा साप आपल्या सुटकेसाठी तडफड करताना दिसत आहे. मात्र, या पक्षाने त्याला चोचीत घट्ट पकडं आहे. (हेही वाचा - Viral Video: स्टंट करणाऱ्या कारसमोर अचानक आली जाड महिला; पुढं काय झालं तुम्हीच पहा)

दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. पक्षी आपल्या चोचीत साप पकडून हवेत उडत तलाव ओलांडताना दिसत आहे. साप पक्ष्याच्या तावडीतून बाहेर पडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. मात्र, त्याला यश मिळत नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saurabh Jadhav 2110 (@rasal_viper)

सध्या सोशल मीडियावर या पक्षाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ही व्हिडिओ क्लिप पाहून सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला लाखो व्ह्यूज तसेच हजारो लाईक्स मिळत आहेत. याशिवाय अनेक यूजर्संनी या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.