Viral Video: स्टंट करणाऱ्या कारसमोर अचानक आली जाड महिला; पुढं काय झालं तुम्हीच पहा
Car stunts Viral Video (PC - Instagram)

Viral Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असता. यातील काही मजेशी व्हिडिओ पाहून हसू आवरणं कठीण होतं. सध्या सोशल मीडियावर एक जाड महिला आणि स्टंट करणाऱ्या कारचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. शेकडोच्या गर्दीत एक जाड महिला स्टंट करणाऱ्या कारसमोर जाते. त्यानंतर कार जागेवर गोल फिरते. यात या महिलेला कारची जोरदार धडक बसते आणि ती उडून पडते. त्यानंतर ही महिला उठते. आजूबाजूचे लोक तिच्या मदतीसाठी धावून येतात. मात्र, ऐवढी जोरदार धडक बसूनही या महिलेला कोणतीही दुखापत होत नाही. काही तासांत हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला असून नेटिझन्सही त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, गर्दीत गाडीत बसलेला ड्रायव्हर जबरदस्त स्टंट करताना दिसत आहे. जेव्हा एक महिला ड्रायव्हरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला काहीतरी सांगण्यासाठी जवळ जाऊ लागते. मात्र, त्यावेळी तिला कारने जोरदार धडक बसते. ही महिला या धडकेमुळे काही फूट अंतरावर पडते. यानंतर या व्हिडिओच्या फ्रेममध्ये काय होते ते पाहण्यासारखे आहे. (हेही वाचा - Viral Video: रुग्णवाहिका न मिळाल्यान 7 वर्षाच्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन वडिलांनी पायी पार केलं 10 किलोमीटर अंतर; आरोग्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश, Watch Video)

या व्हिडिओवर नेटिझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यातील अनेकांना या महिलेचं कौतुक केलं आहे. गाडीची धडक बसूनही या महिलेला दुखापत झाली नाही.

हा व्हिडीओ केव्हाचा आणि कुठवा आहे हे कळू शकलेले नाही. इन्स्टाग्रामवर punjabi_industry नावाच्या पेजवरही हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.