Bill Gates Roti Video: बिल गेट्स यांनी बिहारी स्टाईलने बनवली चपाती; पीएम मोदींनी केलं कौतुक, Watch Video

चपाती बनवण्याच्या गेट्सच्या प्रयत्नांचे कौतुक करताना पीएम मोदी म्हणाले, "उत्कृष्ट, भारतात बाजरीचे अनेक पदार्थ आहेत, जे तुम्ही बनवू शकता." आपल्या ट्विटद्वारे पंतप्रधानांनी मायक्रोसॉफ्टच्या संस्थापकांना बाजरीच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

Bill Gates Make Roti (PC - Twitter/@EitanBernath)

Bill Gates Roti Video: मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स (Bill Gates) यांचा चपाती बनवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात बिल गेट्स शेफ इटान बर्नाथ (Eitan Bernath) सोबत आहेत आणि ते चमच्याने पीठ मळताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये गेट्स चपाती लाटताना आणि नंतर ही चपाती तूप लावून खातानाही दिसत आहेत. हा व्हिडिओ शेफ ईटन बर्नाथ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही प्रतिक्रिया आली आहे.

काय म्हणाले पीएम मोदी?

चपाती बनवण्याच्या गेट्सच्या प्रयत्नांचे कौतुक करताना पीएम मोदी म्हणाले, "उत्कृष्ट, भारतात बाजरीचे अनेक पदार्थ आहेत, जे तुम्ही बनवू शकता." आपल्या ट्विटद्वारे पंतप्रधानांनी मायक्रोसॉफ्टच्या संस्थापकांना बाजरीच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांनी या ट्विटमध्ये स्मायली इमोजीचाही वापर केला आहे. (हेही वाचा - Super Cows: चीनने क्लोनिंगद्वारे तयार केल्या 3 'सुपर गायी'; एका वर्षात देऊ शकतात 17 हजार 500 लिटर दूध, जाणून घ्या सविस्तर)

शेफ बर्नाथने शेअर केला व्हिडिओ -

विशेष म्हणजे, ईटन बर्नाथ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना लिहिले, "@BillGates आणि मला एकत्र भारतीय ब्रेड (चपाती) बनवताना खूप मजा आली. मी नुकतेच बिहार, भारतातून परत आलो, जिथे मी एका शेतकऱ्याला भेटलो. मी त्यांचा खूप आभारी आहे. येथील "दीदी की रसोई" कँटीनच्या स्त्रियांमुळे मी चपाती बनवायला शिकू शकलो."

व्हिडिओच्या सुरुवातीला शेफ ईटन बर्नाथने मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची ओळख करून दिली आहे. मग तो गेट्सला नवीन डिश म्हणजेच भारतीय ब्रेडबद्दल सांगतो. यानंतर बिल गेट्स पीठ मळताना आणि रोट्या लाटताना दिसत आहेत. दरम्यान, बर्नाथ गेट्सला सांगतो की, त्याने भारताच्या दौऱ्यात बिहारमधील "दीदी की रसोई" च्या महिलांकडून चपाती बनवण्याची कला अवगत केली. या व्हिडिमध्ये तो म्हणतो की, मी भारतात गव्हाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही भेटलो होतो.

बिल गेट्स यांनी केलं भारतीय चपातीचे कौतुक -

हा व्हिडिओ अपलोड होताच ट्विटरवर अडीच लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला होता. व्हिडीओमध्ये गेट्स म्हणतात की, ते खूप दिवसांनी स्वयंपाक करत आहेत. गेट्सने अंड्याच्या आकाराची चपाती बनवली. मात्र, ईटनने गोल आकाराची चपाती बनवली. यानंतर या व्हिडीओमध्ये दोघींनी चपाती तव्यावर भाजली आणि तूप घालून खाल्ली. बिल गेट्स यांनीही भारतीय चपातीचे "छान आहे! खूप स्वादिष्ट," अशा शब्दांत कौतुक केलं.