बंगळुरु रेल्वेस्थानकावरील सरकत्या जिन्यांचे कामागारांच्या 10 वर्षीय मुलीकडून उद्घाटन
मात्र सरकत्या जिन्यांचे उद्घटन कोणत्या नेतेमंडळी किंवा दिग्गज व्यक्तीकडून नव्हे तर कामगारांच्या 10 वर्षाच्या मुलीकडून करण्यात आले.
बंगळुरु (Bengaluru) येथील रेल्वे स्थानकात नव्याने सुरु करण्यात आलेल्या सरकत्या जिन्यांचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. मात्र सरकत्या जिन्यांचे उद्घटन कोणत्या नेतेमंडळी किंवा दिग्गज व्यक्तीकडून नव्हे तर कामगारांच्या 10 वर्षाच्या मुलीकडून करण्यात आले. याबाबत आता बंगळुरुच्या रेल्वेस्थानकाचे नागरिकांकडून आणि दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.
स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 येथे नव्याने सरकत्या जिन्यांची सोय प्रवाशांसाठी करुन देण्यात आली आहे. त्याचसोबत येथेच वातानुकुलित हॉल सुद्धा प्रवाशांचा प्रतिक्षेसाठी सुरु करण्यात आला आहे. या गोष्टींचे उद्घाटन शनिवारी बंगळुरुचे केंद्रीय खासदार पीसी मोहन यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र बाबरी मस्जिद प्रकरणाचा निकाल लागणार असल्याने राज्यात कलम 144 लागू करण्यात आला होती. त्यामुळे औपचारिकरित्या कार्यक्रमाचे आयोजन रद्द करण्यात आले. तर चांदबी ही बंगळुरु रेल्वेस्थानकात गेल्या काही महिन्यांपासून काम करत होती. त्यामुळेच या सार्वजनिक सरकत्या जिन्यांचे उद्घाटन सुद्धा सामान्य व्यक्तीकडून करण्यात यावे असे ठरवण्यात आले. त्यानुसार चांदबी हिची मुलगी बेगुम्मा हिच्या हस्ते सरकत्या जिन्यांचे उद्घाटन करण्यात आले.(बर्लिनची भिंत पडल्याचा 30 वा स्मृतिदिन: या महत्वाच्या ऐतिहासिक घटनेची आठवण करून देणारे खास Google Doodle)
पहिल्यांदाच एखाद्या सामान्य माणसाच्या हस्ते सरकत्या जिन्यांचे उद्घाटन शासनाकडून करण्यात आले ते सुद्धा कोणत्या दिग्गजाला न बोलवता. स्थानकात बसवण्यात आलेल्या सरकत्या जिन्यांमुळे जेष्ठ नागरिकांना याचा फायदा होणार आहे. त्याचसोबत 10 नोव्हेंबर पासून हा जिना सर्वांसाठी सुरु करण्यात येणार आहे. तत्पूर्वी अद्याप या जिन्यांचे काम सुरु असून तेथे एक डिजिट घड्याळ बसवण्यात आले आहे. त्यानुसार वेळेपूर्वी काम पू्र्ण होणार असल्याची शक्यता सांगण्यात आले आहे.