Baba Vanga Prediction: बाबा वंगा यांची भविष्यवाणी, म्हणते '2022 मध्ये भारतात येईल मोठी नसर्गिक आपत्ती', घ्या अधिक जाणून
पण त्यांना मानणारा वर्गही मोठा आहे. याच बाबा वंगा यांनी भारताबद्दल एक भविष्यवाणी (Baba Vanga Prediction for India) केली आहे. ज्यामुळे अनेकांना चिंता वाटते. बाबा वंगा यांच्या मते, या वर्षी भारतात गंभीर संकट (Big Natural Attack) येणार आहे.
Baba Vanga Prediction: बाबा वंगा च्या भविष्यवाण्यांवर अनेकदा वाद होतात. पण त्यांना मानणारा वर्गही मोठा आहे. याच बाबा वंगा यांनी भारताबद्दल एक भविष्यवाणी (Baba Vanga Prediction for India) केली आहे. ज्यामुळे अनेकांना चिंता वाटते. बाबा वंगा यांच्या मते, या वर्षी भारतात गंभीर संकट (Big Natural Attack) येणार आहे. ज्यामुळे दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. बाबा वंगा यांनी याआधी 2022 या वर्षाच्या संदर्भात अनेक भाकिते केली होती, त्यापैकी दोन खरी ठरल्याचे सांगितले जाते. एकावृत्तानुसार बाबांनी भारतावर टोळ धाडीचे आक्रमणाची भविष्यवाणी केली होती. यामुळे उपासमार होऊ शकते, असेही ते म्हणाले होते.
बाबा वंगा यांनी म्हटले आहे की, 2022 मध्ये जगभरात तापमान वाढेल. ज्यामुळे टोळांचा प्रकोप वाढेल. या टोळांचे थवे भारतातील पिके नष्ट करतील. त्यामुळे देशात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल. बाबा वेंगा यांनी या वर्षासाठी 6 अंदाज वर्तवले. सायबेरियातून नवीन विषाणूच्या आगमनाव्यतिरिक्त, परकीय आक्रमणे, टोळांचे हल्ले, पूर, दुष्काळ आणि आभासी वास्तविकतेचा उदय असे ते अंदाज आहेत. (हेही वाचा, Baba Vanga’s Prediction: नेत्रहीन बाबा वंगा यांच्या 2022 मधील 6 पैकी 2 भविष्यवाण्या ठरल्या खऱ्या; जाणून घ्या सविस्तर)
बाबा वंगा यांनी वर्तविलेल्या भविष्याबाबत आम्ही सहमत आहोत असे नव्हे परंतू, ऑस्ट्रेलिया आणि आशियाई देशांमध्ये पूर येण्याची भविष्यवाणी केली होती, ती खरी ठरली आहे. ऑस्ट्रेलियातील पुरामुळे समस्या आणखी वाढली. त्याचवेळी पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळेही परिस्थिती गंभीर होत चालली आहे. याशिवाय बाबा वेंगा यांनी अनेक शहरांमध्ये पाणी कमी पडणार असल्याचे भाकीत केले होते, ते खरे ठरले आहे. पोर्तुगालशिवाय इटलीतील अनेक शहरे यंदा दुष्काळाच्या तडाख्यात आहेत.
बाबा वंगा यांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियात झाला. तो त्याच्या अंदाजांसाठी ओळखला जातो. वयाच्या 12 व्या वर्षी बाबा वेंगा यांचे डोळे गेले. बाबा आंधळे असले तरी भविष्य पाहण्याची त्यांच्यात विशेष क्षमता होती. देवाने त्याला दिव्य दृष्टी दिली असे म्हणतात. वेंगा यांनी बराक ओबामा यांच्याबद्दल अचूक भाकीत केल्याचे सांगितले जाते. अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष कृष्णवर्णीय असतील हे खरे होते.