Baba Vanga 2022 Predictions: बाबा वंगा यांच्या 2022 साठीच्या जगाला हादरवून टाकणाऱ्या भविष्यवाण्या; होणार नवीन विषाणूचा उद्रेक, येणार अनेक नैसर्गिक आपत्त्या

सोव्हिएत युनियनचे विघटन, 9/11 चा दहशतवादी हल्ला, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू अशा अनेक गोष्टींचे भाकीत बाबा वांगे यांनी केले होते, जे अगदी खरे ठरले

Baba Vanga (Photo Credits : Wikimedia )

काही चांगल्या आणि काही वाईट आठवणी घेऊन आता 2021 हे वर्ष आपली रजा घेणार आहे. यासोबतच नवीन वर्ष 2022 संदर्भात अनेक ज्योतिषांच्या भविष्यवाण्या समोर येऊ लागल्या आहेत. यामध्ये जगाला उत्सुकता लागलेली होती ती बाबा वंगा (Baba Vanga) यांच्या भविष्याची. बल्गेरियातील नेत्रहीन वांगेलिया पांडवा गुश्तेरोवा (Vangeliya Pandeva Gushterova) उर्फ ​​बाबा वंगा फकीर या एक जगप्रसिद्ध ज्योतिष होत्या. असे म्हणतात की, दृष्टी नसली तरी त्या भविष्यात स्पष्टपणे पाहू शकत होत्या. त्यांची अनेक भाकिते खरी ठरली आहेत. आता बाबा वंगा यांनी 2022 हे वर्ष काय घेऊन येणार आहे याबाबत आपले मत मांडले आहे.

सायबेरियात धोकादायक विषाणू सापडेल –

2022 मध्ये ग्लोबल वॉर्मिंग आपत्तीजनक ठरणार आहे. तापमानवाढीमुळे रशियाच्या सायबेरिया भागात बर्फ वितळण्यास सुरुवात होईल, त्यामुळे याठिकाणी शास्त्रज्ञांच्या टीमला प्राणघातक विषाणूचा शोध लागू शकतो. हा विषाणू खूप संसर्गजन्य असेल आणि वेगाने पसरेल. या संसर्गाचा सामना करण्यासाठी जगातील सर्व व्यवस्था अपयशी ठरतील.

जगात पाण्याची कमतरता -

वंगा बाबा यांच्या मते, 2022 मध्ये जगातील पाण्याचे संकट अधिक गहिरे होणार आहे. अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार आहे. नद्यांचे पाणी प्रदूषित होईल आणि तलाव आकुंचन पावतील. पाण्याअभावी लोकांना इतर ठिकाणी स्थलांतर करावे लागेल.

भारतावर टोळांचा हल्ला -

जागतिक तापमानवाढीचा परिणाम भारतावरही होणार आहे. त्यामुळे देशातील अनेक भागात कमाल तापमान 50 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचेल. तापमानात वाढ झाल्यामुळे टोळांचे प्रमाण वाढेल आणि ते शेतातील लाखो पिकांवर हल्ला करून नष्ट करतील. त्यामुळे देशात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल.

एलियन अलर्ट –

बाबा वंगा यांच्यामते ‘ओमुआमुआ’ नावाचा एक लघुग्रह एलियनद्वारे पृथ्वी ग्रहावरील जीवनाचा शोध घेण्यासाठी पाठवला जाईल आणि त्याद्वारे एलियन मानवाला कैद करून घेऊन जाऊ शकतात.

लोकांना गॅजेट्सचे व्यसन –

अंदाजानुसार या वर्षी लोक मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवतील. त्यांची ही सवय हळूहळू व्यसनाचे रूप घेईल, त्यामुळे लोकांची मानसिक स्थिती बिघडेल आणि ते मानसिकदृष्ट्या आजारी होतील.

नैसर्गिक आपत्ती-

वंगा बाबा यांच्यानुसार 2022 मध्ये जगात भूकंप आणि सुनामीचा धोका वाढेल. हिंद महासागरातील भूकंपानंतर एक मोठी त्सुनामी उद्भवेल, जिचा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया, भारत यासह जगातील किनारी भागांतील देशांवर परिणाम होईल. या सुनामीत शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागणार आहे. (हेही वाचा: Pakistan मध्ये झाडांवर उगवली अंडी? खोटा दावा करून पांढऱ्या वांग्याचा व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या सत्य)

दरम्यान, बाबा वंगा यांनी वर्तवलेला 80 टक्के अंदाज खरा ठरला आहे. सोव्हिएत युनियनचे विघटन, 9/11 चा दहशतवादी हल्ला, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू अशा अनेक गोष्टींचे भाकीत बाबा वांगे यांनी केले होते, जे अगदी खरे ठरले. दरम्यान, वंगा बाबा यांचे 1996 साली निधन झाले. त्यांची भविष्यवाणी कुठेही लिहिलेली नाही. म्हटले जाते की त्यांनी या भविष्यवाण्या त्यांच्या अनुयायांना तोंडी सांगितल्या होत्या. आता 2022 बद्दलचे त्यांचे आकलन कितपत अचूक आहे, हे येणारा काळच सांगेल.