Sacred Games 2 नेटफ्लिक्स वर 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता होणार टेलिकास्ट; पहा नेटकर्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
मागील वर्षभरापासून अनेक चाहते या वेब सीरीजची वाट पाहत होते. आता अखेर आज रात्री 12 वाजल्यापासून प्रेक्षकांना ही सीरीज पाहता येणार आहे.
Sacred Games 2 Date and Time: नेटफ्लिक्स इंडियाची (Netflix India) भारतातील पहिली वेब सीरीज सेक्रेड गेम्स ला रसिकांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या सीरीजच्या सीझन 2 ची प्रतिक्षा आहे. 15 ऑगस्टला सेक्रेड गेम्स 2 (Sacred Games) रिलीज होणार आहे. काही वेळापूर्वीच ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून सेक्रेड गेम्स 2 आज रात्री 12 वाजता रीलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे ट्विट करताना 'निंद का बलिदान देना होगा' असं कॅप्शन लिहल्याने आता ट्विटरवर सेक्रेडच्या गेम्स च्या चाहत्यांनी दिलेल्या काही मजेशीर प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत.
अवघ्या काही तासात रसिकांना सेक्रेड गेम्स 2 पाहता येणार आहे. मागील वर्षभरापासून अनेक चाहते या वेब सीरीजची वाट पाहत होते. आता अखेर आज रात्री 12 वाजल्यापासून प्रेक्षकांना ही सीरीज पाहता येणार आहे. Sacred Games 2 Trailer पहा.
Netflix India Tweet
ट्विटरकरांच्या प्रतिक्रिया
‘जंग का वक्त आ गया है’म्हणत गणेश गायतोंडे पुन्हा एकदा सरताज सिंगला आव्हान देणार आहे. यामध्ये सैफ अली खान, नवाझुद्दीन सिद्दीकी सह अमेय वाघ, अमृता सुभाष ही मराठमोळी मंडळीदेखील दिसणार आहेत.