Anushrut Haircut Viral Video:केस कापताना चिडणार्‍या नागपूरच्या अनुश्रूत चा नवा मजेशीर व्हिडिओ देखील वायरल (Watch Video)

मात्र सलून मध्ये केस कापताना त्याची हतबलता, राग आणि निरागसपणा अनेकांना भावली आहे.

Anushrut (Photo Credits: Video Screengrab/ @Anup20992699/ Twitter)

जर तुम्ही सोशल मीडीयामध्ये अ‍ॅक्टिव्ह असाल, इंटरनेट ट्रेंडबाबत तुम्ही सजग असाल तर तुम्हांला अनुश्रूत (Anushrut) हा चिमुरडा परिचित असेल. नागपूरच्या (Nagpur) या चिमुरड्याचा केस कापताना नाकावरचा लटका रंग पाहून अनेकांना हसू अनावर झाले होते. नोव्हेंबर महिन्यात त्याचा एक व्हिडिओ वायरल झाल्यानंतर आता पुन्हा नवा हेअर कट करताना त्याच्या नाकावरचा राग, डायलॉगबाजी नेटकर्‍यांचं मन जिंकत आहे.

दरम्यान अनुश्रूत याचे वडील अनूप यांनी अनुश्रूतचा नवा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘तुमका कैसा लग रहा है?’ असा प्रश्न सलूनवाल्याने विचारल्यानंतर अनुश्रुतने तोंड पाडून ‘गंदा लग रहा है’ असं मजेशीर उत्तर दिलं आहे. तर वरचे केस कापू नका मी टकला होईन असं मजेशीर उत्तर देत सलूनवाल्यासोबत घातलेला वाद बघून अनेकांना पुन्हा अनुश्रूतच्या निरागसपणा त्याच्या प्रेमात पाडणारा ठरला आहे. Year Ender 2020: लहान मुलांच्या या '5' व्हिडिओजची सोशल मीडियावर धूम; पहा यावर्षी व्हायरल झालेले Cute Videos.

अनुश्रूतचा व्हिडिओ

ट्वीटरवर अनुश्रूतचा व्हिडिओ 22 जानेवारीला शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला बघता बघता नेटकर्‍यांनी तुफान प्रतिसाद देत अनुश्रूतवरही प्रेम व्यक्त केले आहे. अनुश्रूत हा गोबर्‍या गालांचा 4 वर्षांचा मुलगा आहे. मात्र सलून मध्ये केस कापताना त्याची हतबलता, राग आणि निरागसपणा अनेकांना भावली आहे.