धक्कादायक! 30 रुपयांची लाच दिली नाही म्हणून 6 वर्षांच्या निष्पाप मुलाला ओढायला लावला स्ट्रेचर; व्हिडिओ व्हायरल, डीएमनी दिले चौकशीचे आदेश (Watch Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमधून, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील देवरिया जिल्हा (Deoria District) रूग्णालयात लहान-सहान सुविधांसाठी रूग्णांकडून कशी लाच (Bribe) घेतली जाते याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमधून, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील देवरिया जिल्हा (Deoria District) रूग्णालयात लहान-सहान सुविधांसाठी रूग्णांकडून कशी लाच (Bribe) घेतली जाते याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सहा वर्षांचा एक निष्पाप चिमुरडा स्वतः स्ट्रेचर (Stretcher) ओढून रुग्णाला घेऊन जाताना दिसत आहे. या मुलाचे आजोबा आजोबा स्ट्रेचरवर झोपले आहेत. स्ट्रेचरसाठी 30 रुपये दिले नाहीत म्हणून या 6 वर्षाच्या मुलावर हा स्ट्रेचर ओढायची वेळ आली आहे. देवरिया जिल्हा रूग्णालयात घडलेल्या या घटनेबाबत डीएम अमित किशोर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरियाच्या बरहज भागातील गौरा गावचा रहिवासी छेदी यादव हा प्राणघातक हल्ल्यात जखमी झाला होता. त्याला देवरिया जिल्हा रुग्णालयाच्या सर्जिकल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. छेदी यादव यांची मुलगी बिंदू हिने सांगितले की, ती तीन ते चार दिवसांपासून आपल्या वडिलांसोबत जिल्हा रुग्णालयात आहे. येथे त्यांना ड्रेसिंगसाठी ड्रेसिंग रूममध्ये घेऊन जावे लागते. परंतु प्रत्येकवेळी हॉस्पिटलचे कर्मचारी स्ट्रेचरसाठी 30 रुपयांची मागणी करतात. कुटुंबाकडे प्रत्येकवेळी देण्यास 30 रुपये नसल्याने त्यांनी त्यासाठी नकार दिला. या वेळी हॉस्पिटलच्या कर्मचार्यांनी छेदी यादव यांना ड्रेसिंगसाठी घेऊन जाण्यास नकार दिला. (हेही वाचा: तहानलेल्या खारूताईचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ पाहून व्हाल भावूक; Watch Video)
पहा व्हिडिओ -
ते म्हणाले, जर 30 रुपये नसतील तर रुग्णाला स्वत: ड्रेसिंग रूममध्ये जावे लागेल. त्यानंतर बिंदू देवीने आपल्या सहा वर्षांच्या मुलाच्या शिवम यादवच्या मदतीने वडिलांना ड्रेसिंग रूममध्ये नेले. दरम्यान, कोणीतरी व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेची तपासणी करण्यासाठी सोमवारी डीएम जिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील ड्युटीवर असलेल्या वॉर्ड बॉयला काढून टाकून एसडीएमकडे चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तपास अहवालाच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाईल.