Amruta Fadnavis New Song: अमृता फडणवीस यांचे आणखी एक नवे गाणे; Women's Day 2021 निमित्त चाहत्यांना नवी भेट (Watch Video)
त्यामुळे अनेकांना अमृता फडणवीस या आपल्या गायनातून चाहत्यांना आणखी काय ऐकवणार याची उत्सुकता होतीच. कुणी म्हणाले (Kuni Mhanal) असे या गाण्याचे बोल आहेत.
सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून आपल्या गायन कलेचा छंद जोपासणाऱ्या अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचे आणखी एक गाणे (Amruta Fadnavis New Song) त्यांच्या चाहत्यांच्या भेटीला आले आहे. येत्या 8 मार्च या दिवशी महिला दिनानिमित्त एक गाणे चाहत्यांच्या भेटीला येणार अशी कल्पना अमृता फडणवीस यांनी आगोदरच दिली होती. त्यामुळे अनेकांना अमृता फडणवीस या आपल्या गायनातून चाहत्यांना आणखी काय ऐकवणार याची उत्सुकता होतीच. कुणी म्हणाले (Kuni Mhanal) असे या गाण्याचे बोल आहेत. दरम्यान, या आधीही त्यांची काही गाणी रिलीज झाली आहेत. त्यापैकी 'तिला जगू द्या' हे एक गाणे. या गाण्यावर सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. आता नव्या गाण्याचे नेटीझन्स कसे स्वागत करतात याबाबतही उत्सुकता आहे.
अमृता फडणवीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत. काही दिवासांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रसारमाध्यमांशी बोलताना महिला दिनानिमत्त येत्या 8 मार्चला आपण एक गाणे घेऊन येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली होती. सोशल मीडियावर आपले गाणे ऐकून होणाऱ्या ट्रोलर्सला आपण कसे उत्तर द्याल असा प्रश्न अमृता फडणवीस यांना प्रसारमाध्यमांनी विचारला होता. यावर त्या बोलत होत्या. (हेही वाचा, Amruta Fadnavis यांचे व्हॅलेंटाईन डे निमित्त 'ये नयन डरे डरे' गाणे प्रदर्शित, Watch Video)
आपल्या गाण्याविषयी अमृता फडणवीस यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.. हे माझे नाट्य संगीतावर आधारित गीत सादर करते, आज जागतिक महिला दिनी फक्त तुमच्या साठी ! नक्की ऐका.
दरम्यान, T-Series Marathi च्या युट्यूब चॅनलवर असलेले हे गाणे कुणीSwapna Patker यांनी लिहीले आहे. अल्बमचे नाव आणि गिताचे बोल Kuni Mhanale असे आहेत. अमृता फडणवीस यांनी गायलेल्या या गाण्याला Rohan Rohan यांनी संगित दिले आहे.