Monkey Flying Kite: गच्चीवर बसून चक्क माकडाने मजेत उडवला पतंग; लॉक डाऊनमध्ये वेगाने होत आहे Evolution, पहा Video
अशावेळी लॉक घरात आहेत, त्यांचे रुटीन बदलले आहे. दुसरीकडे प्राणी मजा-मस्ती करताना दिसत आहेत. रस्त्यावर लोक नसल्याने
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. अशावेळी लॉक घरात आहेत, त्यांचे रुटीन बदलले आहे. दुसरीकडे प्राणी मजा-मस्ती करताना दिसत आहेत. रस्त्यावर लोक नसल्याने याआधी अनेक प्राणी बाहेर मुक्तपणे हिंडताना दिसून आले होते. आता असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही तुमचे हसू आवरू शकणार नाही. तर या व्हिडिओमध्ये चक्क एक माकड पतंग उडवताना दिसत आहेत. एका घराच्या गच्चीवर बसून हे माकड निवांतपणे पतंग उडवत आहे.
तर हे माकड एका गच्चीवर बसले असताना अचानक त्याच्या हातात मांझा आला, आणि मग काय बघता बघता माकडाने पतंग हवेत उडवायला सुरुवात केली. त्यवेळी आकाशात अनेक पतंग उडत होते हे पाहून या माकडाला अजून जोर चढला. ट्विटरवर हा व्हिडिओ ओडिशाच्या फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना ते लिहितात, 'लॉकडाऊनमुळे उत्क्रांती जलद होत आहे. एक माकड पतंग उडवत आहे'.
आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे व याला बर्याच लाईक्स आणि री-ट्वीटदेखील मिळाल्या आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या लोक त्यांच्या घरात बंद आहेत त्यामुळे बाहेर पूर्णतः शांतता आहे. अशात प्राणी या परिस्थितीचा फायदा घेत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथे सुद्धा डॉल्फिन्सचे दर्शन झाले होते. त्यानंतर साऊथ मुंबई मधील बाबुलनाथ परिसरात रस्त्यावर मोरही आढळले होते. सध्या कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण देश 3 मे पर्यंत लॉक डाऊनमध्ये आहे. अशावेळी शहरांतील रस्ते ओस पडले आहेत, रस्त्यावर वाहने नाहीत का लोक नाहीत, त्यामुळे हे प्राणी-पक्षी मनसोक्त फिरताना दिसून येत आहेत.