Emirates कर्मचार्‍यांच्या युनिफॉर्ममध्ये Coronavirus Pandemic दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून बदल; पहा नव्या Dress Code ची झलक!

पण आता खबरदारीचा उपाय म्हणून Emiratesच्या कर्मचार्‍यांना PPE डिसपोजेबल गाऊन, मास्क आणि ग्लोव्ह दिले जाणार आहेत.

Emirates । Photo Credits: Twiiter/ Emirates

कोरोना व्हायरस संकटातही Emirates या विमान कंपनीने आपाली सेवा सुरू ठेवली आहे. पण आता खबरदारीचा उपाय म्हणून Emiratesच्या कर्मचार्‍यांना PPE डिसपोजेबल गाऊन, मास्क आणि ग्लोव्ह दिले जाणार आहेत. सार्‍या केबिन क्रु सह, बॉर्डिंग एजंट्स, ग्राऊंड स्टाफ यांना ही सुरक्षा पुरवली जाणार आहे. यामुळे कोरोनापासून एमरिट्सचे कर्मचारी आणि प्रवासी देखील सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वर सार्‍या कर्मचारी आणि प्रवाशांना ग्लोव्ह्स आणि मास्क घालणं बंधनकारक आहे. थर्मल स्कॅनरच्या माध्यमातून प्रवाशांच्या शरीराचे तापमान पाहिले जाणार आहे. यासोबतच कर्मचार्‍यांचीही तपासणी होईल. ग्राऊंडवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी विशेष सोय असेल. चेक ईन आणि बोर्डिंग साठीदेखील वेटिंग एरियामध्ये खास सोय असेल.

एअरपोर्ट टीमकडून देखील प्रोटेटिव्ह बॅरियर्स ठेवले जाणार आहेत. यामुळे चेक ईन डेस्कच्या वेळेसही सुरक्षित अंतर पाळण्यास मदत होईल. फ्लाईटमध्येही सुरक्षेच्या कारणास्तव खाद्यपदार्थ आणि पेय बेंटो स्टाईल बॉक्समधून दिले जातील. यामुळे क्रु आणि प्रवाशांमधील कॉन्टॅक्ट कमी होईल. पर्सनल बॉक्समध्ये प्रवाशांना सॅन्ड्व्हिच, शीतपेय, स्नॅक्स आणि गोडाचा पदार्थ दिला जाईल. SpiceJet व GoAir कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवले बिन पगारी रजेवर; लॉकडाऊनमुळे केली खर्चात कपात

Emirates Airline ट्वीट 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आता व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी मॅग्झीन, वर्तमानपत्र बंद असतील. कॅबिन बॅगेज सध्या प्रवासी घेऊन फिरू शकत नाहीत. प्रवाशांना केवळ लॅपटॉप, हॅंडबॅंग, ब्रिफकेस, आणि लहान मुलांच्या वस्तू घेऊन जाण्यास परवनगी आहे. चेक ईन पासून पूर्ण प्रवासात लोकांना मास्क आणि ग्लोव्ह घालणं बंधनकारक आहे.

विमानाच्या प्रत्येक फेरीनंतर दुबईमध्ये Emiratesची सारी विमानं disinfectकेली जातील.