IPL Auction 2025 Live

America: 70 वर्षात पहिल्यांदाच महिलेला मिळाली Death Penalty, विषारी इंजेक्शन देऊन दिली जाणार मृत्यूची शिक्षा

अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी असे म्हटले की, 2004 मध्ये हत्ये प्रकरणी दोषी ठरलेली लिसा मोंटगोमरी (Lisa Montgomery) हिला मृत्यूची शिक्षा देण्यासाठी 8 डिसेंबर ही तारीख ठरवण्यात आली आहे.

Lisa Montgomery, (फोटो क्रेडिट्स: YouTube)

अमेरिकेत (America) जवळजवळ 70 वर्षानंतर पहिल्यांदाच एखाद्या महिलेला मृत्यूची शिक्षा दिली जाणार आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी असे म्हटले की, 2004 मध्ये हत्ये प्रकरणी दोषी ठरलेली लिसा मोंटगोमरी (Lisa Montgomery) हिला मृत्यूची शिक्षा देण्यासाठी 8 डिसेंबर ही तारीख ठरवण्यात आली आहे. जी 70 वर्षांत पहिल्यांदाच महिलेला मृत्यूची शिक्षा दिली जाणार आहे. महिलेने एका दुसऱ्या गर्भवतीची महिलेची हत्या आणि तिच्या मुलाचे अपहरण केल्या प्रकरणी आरोपी ठरली होती. कोर्टाच्या आदेशानुसार तिला 8 डिसेंबरला अत्यंत विषारी पद्धतीचे इंजेक्शन देऊन मृत्यूची शिक्षा दिली जाणार आहे.

अधिकाऱ्यांच्या मते 2004 मध्ये 23 वर्षीय बॉबी स्टीनेट पाळीव कुत्रा खरेदी करण्यासाठी मिसौरी येथील लिसा मांटगोमेरी हिच्या घरी आली होती. या दरम्यान, मांटगोमेरी हिने तिची हत्या केल्याचा प्रकार घडला होता. ऐवढेच नाही तर 36 वर्षीय मांटोगोमेरी हिने 8 महिन्यांची गर्भवती असलेल्यी स्टीनेट हिचा रशीने गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचे पोट फाडून मुलाला घेऊन तिने पळ काढला होता. अटक केल्यानंतर मोंटगोमरी हिने तिचा गुन्हा कोर्टासमोर कबुल केला. त्यानंतर 2008 मध्ये न्यायमूर्तींनी तिला अपहरण आणि हत्येसाठी दोषी ठरवले. या प्ररकरणी सुनावणी वेळी मांटगोमेरी चे वकील कोर्टात असे म्हटले की, ती आजारी आहे. पण कोर्टाने ते फेटाळून लावले.(America: 10 वर्षात 'तिने' दिला 10 बाळांना जन्म; 36 वर्षीय महिला पुन्हा प्रेग्नेंट)

तर लिसा मोंटगोमरी ही नववी महिला कैदी असून तिला मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1953 मध्ये सुद्धा अमेरिकेत एका महिलेला अशीच शिक्षा सुनावण्यात आली होती. डेथ पेनल्टी इंन्फॉर्मेशन सेंटर यांच्या नुसार, संयुक्त राज्य अमेरिकेत 2 टक्के अपराधी व्यक्ती फाशीच्या शिक्षेची प्रतिक्षा करत आहेत. महिलांच्याद्वारे करण्यात आलेले हिंसक अशा अपराधांची शिक्षा ही पुरुषांच्या तुलनेच फार कमी आहे.