Amazon ग्राहकाने शेणाच्या गोवर्यांची चव चाखून पोस्ट केलेला रिव्ह्यू वायरल; पहा Tweet!
पण एका व्यक्तीने चक्क त्याची चव चाखण्याचा अजब प्रकार केला आहे.
अमेझॉन (Amazon) वरून एका व्यक्तीने शेणाच्या गोवर्या (Cow Dung Cakes) विकत घेऊन चक्क त्याचा स्वाद चाखल्याचा एक विचित्र प्रकार समोर आला. दरम्यान चव चाखून त्याचा रिव्ह्यू पोस्ट केल्यानंतर सध्या तो सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. ही चव चाखणार्या व्यक्तीने त्याचं नाव गुप्त ठेवलं आहे. मात्र Dr Sanjay Arora,या ट्वीटर युजरने त्या व्यक्तीच्या रिव्ह्यू चे फोटो पोस्ट करत 'ये मेरा इंडिया.. आय लव्ह माय इंडिया' असं ट्वीट केले आहे.
सर्वसामान्यपणे शेणाच्या गोवर्या या धार्मिक विधींमध्ये वापरण्याची, चूलीत वापरण्याची किंवा शहरी भागात आजकारण घरात धूप करताना शुद्धीकरणासाठी किंवा किडे-मकोडे यांना दूर ठेवण्यासाठी वापरले जातात. पण एका व्यक्तीने चक्क त्याची चव चाखण्याचा अजब प्रकार केला आहे. दरम्यान अमेझॉन कडून या प्रोडक्टच्या डिस्क्रिब्शन मध्ये त्याचा वापर कशासाठी करावा याची स्पष्ट माहिती दिलेली आहे. Amazon वर तीन हजारात विकली जात आहे चक्क नारळाची करवंटी; सोशल मिडियावर नेटिझन्सच्या भन्नाट कमेंट्स.
रिव्ह्यू लिहणार्या व्यक्तीने याची चव अत्यंत खराब आहे. पुढे याचा क्रंचीनेस सुधारण्यासाठी प्रयत्न करा. असा सल्ला देखील दिला आहे. दरम्यान अमेझॉनने दिलेल्या माहितीनुसार, या गोवर्या 100% शुद्ध गायीच्या शेणापासून बनवलेल्या आहेत. त्याचा वापर धार्मिक विधींमध्ये करावा. या हाताने बनवलेल्या असून पूर्ण पणे सुकावलेल्या, मॉईश्चर फ्री आहेत. जाळताना काळजी घ्या असेही त्यामध्ये नमूद केलेले आहे. 5 इंच आकाराच्या या गोवर्या घरातील किडे मकोड्यांना दूर ठेवण्यास मदत करतील असे त्यामध्ये म्हटले आहे.
ज्या डॉ. संजय अरोरा यांनी ही पोस्ट शेअर केली आहे त्यांची पोस्ट देखील वायरल झाली आहे. त्यावरही नेटकर्यांनी आपल्या प्रतिक्रिया लिहित आश्चर्य व्यक्त केलं आहे.