Air Hostess Dance On 'Sami Sami' Song: हवाई सुंदरीचा 'पुष्पा' चित्रपटातील 'सामी सामी' गाण्यावचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओत ही हवाई सुंदरी 'सामी सामी' (Sami Sami Viral Video) गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

Sami Sami Viral Video | (Photo Credit - Insta)

अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिच्या 'पुष्पा' (Pushpa: The Rise) चित्रपटातील गाण्याची छाप तरुणाईवर चांगलीच पडली आहे. या चित्रपटातील गाणी आणि संवाद यांवरुन सोशल मीडियात तर कल्लाच केला आहे. अनेक तरुण-तरुणी या चित्रपटातील गाणी आणि संवाद घेऊन छोटे छोटे व्हिडिओ बनवत आहेत. या व्हिडिओंना मोठा प्रतिसादही मिळतो आहे. एका हवाई सुंदरीलाही या गाण्याची आणि त्यातील डान्सची चांगलीच भूरळ पडली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओत ही हवाई सुंदरी 'सामी सामी' (Sami Sami Viral Video) गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या हवाई सुंदरीचे नाव आयत असे असल्याचे समजते. आयत ही हवाई सुंदरी आहे त्यासोबतच ती कंटेंट क्रिएटरही आहे. सामी सामी गाण्यावर व्हिडिओ बनविल्यावर तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'या गाण्यासाठी खूप साऱ्या रिक्वेस्ट आल्या होत्या. त्यामुळे मी हा व्हडिओ बनविला आहे.' या व्हिडिओला आतापर्यंत 20 हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. या आधी या हवाई सुंदरीने पुष्पा चित्रपटातील 'श्रीवल्ली' गाण्यावर डान्स केला होता. या व्हिडिओलाही युजर्सकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. (वाचा - OMG! वयाच्या 40 व्या वर्षी हॉटनेसचा ओव्हरडोस आहे 'ही' महिला, तरुण मुलांनाही पडते भुरळ)

ट्विट

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Aᴀʏᴀᴛ urf Afreen (@_aayat_official)

'मणिके मगे हिथे' या प्रचंड गाजलेल्या गाण्यावरही आयतने व्हिडिओ बनवला होता. या गाण्यावरील व्हिडिओलाही तिच्या फॅन्सकडून जोरदार प्रतिसाद मिळाला होता. या गाण्यात हवाई सुंदरी आयत ही आपल्या एयर हॉस्टेजच्या गणवेषात होती. तिच्या या व्हिडिओवरही चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या गाण्याला जवळपास 59 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते.