Viral Video: तोंडात पेट्रोल टाकून तरुण करत होता धोकादायक स्टंट; तेवढ्यात लागली दाढीला आग, पहा व्हिडिओ

एका पंडालमध्ये एक तरुण तोंडात पेट्रोल भरून आग पेटवून स्टंट करत होता. दरम्यान त्यांच्या दाढीला आग लागली. शेजारी उभ्या असलेल्या काही लोकांनी ताबोडतोब दाढीला लागलेली आग विझवली.

Viral Video: तोंडात पेट्रोल टाकून तरुण करत होता धोकादायक स्टंट; तेवढ्यात लागली दाढीला आग, पहा व्हिडिओ
Dangerous Stunt Video (PC - Instagram)

Viral Video: सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. सध्या एका तरुणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टंट (Dangerous Stunt) दाखवणाऱ्या तरुणाचा जीव थोडक्यात वाचला. वास्तविक, एका पंडालमध्ये एक तरुण तोंडात पेट्रोल भरून आग पेटवून स्टंट करत होता. दरम्यान त्यांच्या दाढीला आग लागली. शेजारी उभ्या असलेल्या काही लोकांनी ताबोडतोब दाढीला लागलेली आग विझवली.

हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता, ज्याला आतापर्यंत सहा लाखांहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे. त्याचबरोबर याला एक कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडीओ कुठला आहे हे स्पष्ट झालेले नाही. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम यूजर रवी पाटीदारने त्याच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. (हेही वाचा - Video: गुरुग्राममध्ये चालत्या कारवर फटाके फोडले; व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून 3 जणांना अटक (Watch))

व्हिडिओमध्ये एक तरुण टेबलावर उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या हातात एक लाकूड आहे, जे जळत आहे. त्याचवेळी तो लोकांकडे पेट्रोलची बाटली मागतो आणि तोंडात पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करतो. हा तरुण जेव्हा हे करतो तेव्हाच आग पसरते आणि त्याच्या दाढीला आग लागते. हे पाहून आजूबाजूचे लोक घाबरले आणि त्याला वाचवण्यासाठी धावतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravi Patidar (@ravipatidar603)

या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने म्हटलं की ही आग आहे, त्याच्याशी खेळू नका. तुम्ही जळून जाल दुसऱ्या युजरने म्हटले की, भाऊ, अशा प्रकारे तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालत आहात. कृपया स्वतःची काळजी घ्या. त्याचवेळी तिसऱ्या तरुणाने ‘खूप धोकादायक स्टंट’ अशी प्रतिक्रिया दिली. कोणीही असा स्टंट करू नये.

(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2022 05:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).