Dubai Man Bought Private Island For Wife: ऐकावे ते नवलचं! बायकोला बिकिनी घालता यावी म्हणून दुबईतील पठ्ठ्याने चक्क खरेदी केलं 418 कोटी रुपयांचे खाजगी बेट
हा व्हिडिओ एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत 24 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
Dubai Man Bought Private Island For Wife: UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिराती हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा विकसित देश आहे. येथील इमारती, रस्ते, पोलिस आणि लोकांची खर्च करण्याची शैली जगभर प्रसिद्ध आहे. UAE मधील सर्वात प्रसिद्ध शहर म्हणजे दुबई. या शहरात अनेक अब्जाधीश राहतात. ज्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. अलीकडेच एका अब्जाधीश शेखने आपल्या पत्नीसाठी करोडो रुपयांचे बेट विकत घेतले आहे. पण हे बेट खरेदी करण्यामागचं कारण ऐकूण तुम्हा धक्का बसेल. बायकोला बिकिनी (Bikini) घालता यावी म्हणून या पठ्ठ्याने चक्क 418 कोटी रुपयांचे खाजगी बेट (Private Island) खरेदी केले. सध्या सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
दुबईतील या महिलेने दावा केला आहे की, तिच्या अब्जाधीश पतीने तिला समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षित वाटावे म्हणून एक खाजगी बेट विकत घेतले आहे. 26 वर्षीय सौदी अलने स्वत:चा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन लिहिले आहे की, 'POV: तुला बिकिनी घालायची होती म्हणून तुझ्या अब्जाधीश पतीने तुझ्यासाठी बेट विकत घेतले.' (हेही वाचा - Bengaluru Auto Driver Flashes Watch To Take UPI Payments: बेंगळुरू ऑटो चालकाने UPI पेमेंट स्विकारण्यासाठी केला अनोख्या पद्धतीचा वापर; रेल्वेमंत्र्यांनीही केलं कौतुक)
26 वर्षीय सौदी अल नादक ही दुबईतील व्यापारी जमाल अल नादक यांची ब्रिटीश वंशाची पत्नी आहे. HT शी केलेल्या संभाषणात तिने स्वत:ला 'पूर्णवेळ गृहिणी' असल्याचे सांगितले. हे हाय-प्रोफाइल जोडपे दुबईमध्ये शिकत असताना भेटले आणि आता त्यांच्या लग्नाला तीन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. श्रीमंत गृहिणी असण्यासोबतच सौदी अल नादक प्रभावशाली महिला आहे. त्याचे इंस्टाग्राम आणि टिकटॉक अकाऊंट त्याची विलासी जीवनशैली दर्शवतात.
सौदी अल नदाकचा तिच्या पतीने संपूर्ण बेट विकत घेतल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत 24 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. माध्यमांशी संवाद साधताना, दुबईच्या प्रभावशालीने सांगितले की, ती आणि तिचा नवरा गुंतवणुकीसाठी एक बेट खरेदी करण्याचा विचार करत आहेत. सौदी अलने सांगितले की, 'गुंतवणूक म्हणून आम्हाला खूप दिवसांपासून ते करायचे होते आणि माझ्या पतीला मी समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षित वाटावे अशी माझी इच्छा होती, म्हणून त्यांनी एक बेट विकत घेतले.'
सुरक्षा आणि गोपनीयतेच्या कारणांमुळे, सौदीने बेटाचे अचूक स्थान उघड करण्यास नकार दिला, परंतु तिने सांगितले की, तिचा पती जमाल याने या खाजगी बेटासाठी $50 दशलक्ष (सुमारे 418 कोटी रुपये) खर्च केले आहेत. तिने म्हटलं आहे की, 'गोपनीयतेच्या कारणास्तव आम्ही अचूक स्थान शेअर करत नाही. परंतु ते आशियातील असून त्याची किंमत 50 दशलक्ष डॉसर्स आहे.'
ब्रिटनमध्ये जन्मलेल्या सौदीच्या परदेशी सुट्ट्या, फॅन्सी डिनर, डिझायनर बुटीकमधील खरेदी आणि तिच्या विलासी जीवनशैलीची झलक यापूर्वी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. सौदीच्या खाजगी बेट व्हिडिओला देखील टीकेचा सामना करावा लागला. काही यूजर्संनी त्याच्या दाव्यांच्या सत्यतेवर शंका उपस्थित केली आहे.