Viral Video: काय बोलायचे? चक्क 12 लाख रुपये खर्चून बदलले मानवी शरीराचे रुपडे, झाला कुत्रा; व्हिडिओ व्हायरल
एलियन, प्राणी यांच्यासारखे दिसण्याचे वेड जगभरातील अनेक मंडळींना असते हे या आधीही दिसून आले आहे. जपानमधील एका व्यक्तीला (Japanese Man) असेच काहीसे वेड होते. त्याला कुत्रा (Dog) व्हावे असे वाटत असे. त्यासाठी या पठ्ठ्याने चक्क 12 लाख रुपये खर्च करुन स्वत:चे रुपडे बदलले आणि तो कुत्र्यासारखा दिसू (Japanese Man Becomes Dog) लागला.
कोणाच्या डोक्यात कधी कसले वेड येईल सांगता येत नाही. एलियन, प्राणी यांच्यासारखे दिसण्याचे वेड जगभरातील अनेक मंडळींना असते हे या आधीही दिसून आले आहे. जपानमधील एका व्यक्तीला (Japanese Man) असेच काहीसे वेड होते. त्याला कुत्रा (Dog) व्हावे असे वाटत असे. त्यासाठी या पठ्ठ्याने चक्क 12 लाख रुपये खर्च करुन स्वत:चे रुपडे बदलले आणि तो कुत्र्यासारखा दिसू (Japanese Man Becomes Dog) लागला. टोको असे या व्यक्तीचे नाव आहे. ट्विटर यूजर टोकोने @toco_eevee ने ट्विटरवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. ज्याची इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरु आहे. या व्यक्तीने स्वताला कूली (Collie) बनवले आहे. कूली हा एक जपानमधील कुत्र्याची प्रजाती आहे. जेपेट (Zeppet) नावाच्या एका व्यवसायिक संस्थेने या व्यक्तीचे रुपडे पालटले आहे. या व्यक्तीने स्वप्न बाळगले होते की, आपण आयुष्यात एकदा तरी कुत्र्यासारखे व्हायचे.
जापानी न्यूज आउटलेट news.mynavi ने दिलेल्या वृत्तानुसार जेपेट (Zeppet) ही संस्था चित्रपट, व्यावसायिक मनोरंजन आणि इतरही काही सेवा देते. याशिवाय जपानमधील विविध टीव्ही चॅनल्ससाठी पात्राच्या भूमिकेनुसार आवश्यक वेषभुषाही करते. या संस्थेने या व्यक्तीसाठी बनवलेला कुत्र्याचा वेश हा तब्बल 12 लाख रुपयांचा (2 million Yen) आहे. हा बनविण्यासाठी जवळपास 40 दिवस लागले. (हेही वाचा, आश्चर्यंम! लोखंड खाण्याची सवय? शस्त्रक्रिया करून पोटातून काढले तब्बल 116 खिळे, लोखंडी तुकडे आणि वायर)
व्हिडिओ
टोक्यो येथून news.mynaviand ने या संस्थेला विचारले की, Collie याच प्रजातीची निवड का केली? यावर उत्तर असे होते की, कुलीचीच निवड केली कारण हा कुत्रा अतिषय वास्तवदर्शी वाटत होता. संबंधित व्यक्तीने सांगितले की, मला हा कुत्रा आगोदरपासूनच आवडत होता. तो खूपच सुंदर आहे. मी म्हटले की, प्राणी जितका मोठा असेल तितके अधिक चांगले राहील. लांब केसांचा कुत्रा मानवी शरिराला पूर्णपणे झाकू शकतो. त्यासाठी कूली या प्रजातीची निवड करण्यात आली.
ट्विट
मुलाखतकाराने संबंधित व्यक्तीला विचारले की, कुत्र्याचे रुपडे धारण केल्यावर आपण हात पाय कसे हालवता. यावर त्याने सांगितले की, मला काही मर्यादा जरुर येतात. हात पाय हालवतानाही येतात. पण मी सहन करतो आणि सांभाळून घेतो. मी जर ते सहन केले नाही तर ते कुत्र्यासारखे अजिबात वाटणार नाही. टोकोचे एक युट्युब चॅनलही आहे.