अहो आश्चर्यम! चक्क हेल्मेट घालून कुत्र्याने केला दुचाकीवरून प्रवास; सोशल मीडियावर Video व्हायरल
या व्हिडिओमध्ये हा पाळीव कुत्रा त्याच्या मालकाच्या मागे दुचाकीवर स्वार झालेला दिसून येत आहे.
जेव्हापासून देशात कठोर वाहतुकीचे नियम (New Traffic Rule) लागू केले गेले आहेत, तेव्हापासून हे नियम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. परंतु यावेळी ते मनुष्यांमुळे नव्हे तर चक्क कुत्र्यामुळे (Dog) चर्चेत आले आहे. तर, चेन्नई (Chennai) येथे हेल्मेट (Helmet) घालून दुचाकीवर प्रवास करणाऱ्या कुत्र्याचा व्हिडिओ आजकाल व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हा पाळीव कुत्रा त्याच्या मालकाच्या मागे दुचाकीवर स्वार झालेला दिसून येत आहे. मुख्य म्हणजे या कुत्र्याने त्याच्या मालकाप्रमाणे हेल्मेट घातले आहे. हा व्हिडीओ चेन्नईच्या विरुगमबक्कम भागात शूट करण्यात आला आहे.
पहा व्हिडिओ -
जिथे मानव रहदारीचे नियम तोडताना दिसतो, तिथे कुत्रा हेल्मेट घालून दुचाकीवर प्रवास करताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले आहे. व्हिडिओमध्ये, कुत्रा दुचाकीवरून जीभ बाहेर काढत असताना आणि त्याच्या मालकाच्या खांद्यावर आपले दोन्ही पाय ठेऊन मोठ्या आनंदाने प्रवास करताना दिसत आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडिओ मंगळवारी शेअर करण्यात आला. आता पर्यंत तो जवळजवळ 59,000 लोकांनी पाहिला असून, त्याला आतापर्यंत 4,500 हून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.
(हेही वाचा: ऐकावं ते नवलचं! दारु पिऊन तरुणाने केला सापासोबत नागीण डान्स; पहा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ)
मात्र काही लोकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी प्रतिक्रिया दिली की, अशाप्रकारे एका प्राण्याला दुचाकीवरून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. अशाप्रकारे एका कुत्र्याने नियम आणि कायद्यांचे अनुसरण करून हेल्मेट घालून प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये असाच एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यात दिल्लीत त्याच्या मालकाच्या मागे कुत्रा हेल्मेट घालून बसलेला दिसून आला होता. यानंतर बाईक चालविणार्या मुंबईच्या मांजरीच्या फोटोवरही चर्चा झाली होती.