Little Girl Swims With Python: पाळलेल्या अजगरासोबत 8 वर्षांच्या मुलीचे स्विमिंग; थक्क करणारा 'हा' व्हायरल व्हिडिओ नक्की पहा

परंतु, हाच भयंकर प्राणी कोणी पाळला असेल तर?? पाळीव अजगर असल्याने त्याच्यासोबत मैत्री असणे वेगळी गोष्ट. पण त्याच्यासोबत एकाच पूल मध्ये स्विमिंग करणे??

Little Girl Swims With Python (Photo Credits: Twitter)

सापांच्या विभिन्न प्रजातींमध्ये अजगर ही सर्वात मोठी आणि भयंकर प्रजात. आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया च्या जंगलांमध्ये बिनविषारी अजगर (Python) आढळून येतात. अजगर मोठमोठ्या वृक्षांपाशी निपचित पडलेले असतात. शिकार जवळ येताच त्यावर ताव मारुन गिळंकृत करतात. अजगराच्या तावडीतून सुटणे अशक्यप्राय गोष्ट आहे. याचे नाव ऐकताच भीतीचा काटा अंगावर येतो. परंतु, हाच भयंकर प्राणी कोणी पाळला असेल तर?? पाळीव अजगर असल्याने त्याच्यासोबत मैत्री असणे वेगळी गोष्ट. पण त्याच्यासोबत एकाच पूल मध्ये स्विमिंग करणे?? ऐकूनच थक्क झालात ना! हे खरं आहे. इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक लहान मुलगी अजगरासोबत स्विमिंग करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ इजरायल (Israel) मधील असल्याचे बोलले जात आहे. यात एक 8 वर्षांची मुलगी आपल्या पाळलेल्या अजगरासोबत स्विमिंग करताना दिसत आहे. हा अजगर सुमारे 11 फूट लांब आहे. आपल्या घराच्या बॅकयार्डमध्ये असलेल्या स्विमिंग पूलमध्ये ती अजगरासोबत स्विमिंग करते. अजगरासोबत स्विमिंग करणे या मुलीला खूप आवडते. या अजगराचे नाव 'बेले' आहे. वॉल्ट डिज्नीच्या लोकप्रिय सिरीज 'ब्यूटी एंड द बीस्ट'पासून प्रेरित झालेले हे नाव आहे. रॉयटर्स (Reuters) च्या वृत्तानुसार, या मुलीचे नाव इनबार (Inbar)आहे. ती दक्षिण इजरायल मधील कृषि समुदायाच्या एका प्राणी अभ्यारण्यात राहते. त्यामुळे प्राणी हे तिचे सवंगडी आहेत आणि बेले अजगर हा पाळलेल्या प्राण्यांपैकी एक. व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल, इनबार अगदी बिनधास्तपणे अजगरासोबत स्विमिंगचा आनंद घेत आहे. (उत्तर कॅरोलिना येथील एका महिलेच्या घरात आढळला दुर्मिळ दुतोंडी साप; पाहा संपू्र्ण व्हिडिओ)

पहा व्हिडिओ:

प्राप्त माहितीनुसार, कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. त्यामुळे या मुलीला आपल्या लाडक्या मित्रासोबत बेले सोबत अधिकाधिक वेळ घालवता येतो. विशेष म्हणजे इनबार सर्पप्रेमी आहे. "मला बेले सोबत फिरणे आणि त्याच्या सोबत अधिकाधिक वेळ घालवणे आवडते," असे इनबारने रॉयटर्सशी बोलताना सांगितले.