Sister Wrote Long Letter to Convince Brother: भावाची समजूत घालण्यासाठी बहिणीने लिहिले 434 मीटर लांब पत्र; नाराजीचे कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

यामुळे भावाला राग आला. अनेक प्रयत्न करूनही तो बहिणीवर नाराजचं होता. त्यानंतर कृष्णप्रियाने पत्र लिहून भावाला समजवण्याचे ठरवले.

Letter (PC - Facebook)

Sister Wrote Long Letter to Convince Brother: प्रत्येक भाऊ-बहिणीत गोड भांडणे होत असतात. या भांडणात एका बहिणीने भावाचे मन जिंकण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबली. केरळमधील कृष्णप्रिया तिचा भाऊ कृष्णप्रसादला दरवर्षी ब्रदर्स डेनिमित्त शुभेच्छा द्यायची, पण यंदा त्याला शुभेच्छा द्यायला विसरली. यामुळे भावाला राग आला. अनेक प्रयत्न करूनही तो बहिणीवर नाराजचं होता. त्यानंतर कृष्णप्रियाने पत्र लिहून भावाला समजवण्याचे ठरवले. कृष्णप्रियाने सांगितले की, तिला अनेक गोष्टी सांगायच्या होत्या. म्हणूनच तिने 14 बिलिंग पेपरवर आपल्या भावना व्यक्त केल्या. या पत्राचे वजन पाच किलोग्रॅम असून लांबी 434 मीटर आहे. हे जगातील सर्वात लांब पत्र असल्याचे मानले जाते.

हे प्रकरण इडुक्की जिल्ह्यातील आहे. येथे राहणाऱ्या कृष्णप्रिया नावाच्या मुलीने तिच्या धाकट्या भावाची माफी मागण्यासाठी 5 किलो वजनाच्या बिलिंग रोलवर सुमारे 434 मीटर लांब पत्र लिहिले. कृष्णप्रियाचा दावा आहे की, हे पत्र लिहिण्यासाठी तिला 12 तास लागले आहेत. (हेही वाचा - Kai Jhadi Kai Dongar Song: काय झाडी, काय डोंगर...च्या मीम्सनंतर गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

कृष्णप्रियाने सांगितले की, ती या वर्षी 'इंटरनेशनल ब्रदर्स डे' निमित्त तिच्या छोटा भाऊ कृष्णप्रसादला शुभेच्छा देण्यास विसरली. कदाचित याचा राग आल्याने त्याने तिला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले. यानंतर तिने आपल्या भावाला एक लांब आणि जड पत्र लिहिले. युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरमच्या मते, कृष्णप्रियाने आतापर्यंतचे सर्वात मोठे पत्र लिहिले आहे. कृष्णप्रसाद यांनी बहिणीला काही संदेश पाठवले होते. तिने त्याकडे लक्ष दिले नाही. इतरांनी त्याला ब्रदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या हे तिला कळवण्यासाठी त्याने काही स्क्रीनशॉट कृष्णप्रियाला पाठवले. जेव्हा बहिणीने त्याच्या मेसेजना उत्तर दिले नाही किंवा ब्रदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या नाहीत तेव्हा कृष्णप्रसादने तिला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले.

यासंदर्भात बोलताना बहीण कृष्णप्रिया म्हणाली की, मी त्याला शुभेच्छा द्यायला विसरले. सहसा 'ब्रदर्स डे'ला मी त्याला फोन करायचो किंवा अभिनंदन करण्यासाठी मेसेज पाठवत असे. पण या वर्षी माझ्या व्यस्त वेळापत्रकामुळे मी ते विसरले. त्यानंतर माझ्या लक्षात आले की, त्याने मला इतरांच्या शुभेच्छांचे स्क्रीनशॉट पाठवले आहेत. आमचं नातं आई-मुलासारख आहे. पण त्याने माझ्याशी बोलणे बंद केले याचे मला वाईट वाटले. मला व्हॉट्सअॅपवर ब्लॉकही केले.

पत्र लिहिण्यासाठी 15 कागद लागले

कृष्णप्रियाने भावाला 25 मे रोजी भावाला पत्र लिहायला सुरुवात केली. अगोदर तिने ए 4 साइजच्या कागदावर पत्र लिहण्यास सुरुवात केली. पण आपल्या भावनांपुढे पेपर कमी पडणार असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर तिने लांबलचक कागद न मिळाल्याने बिलिंग रोलवरचं पत्र लिहायला सुरुवात केली. यासाठी तिने 15 रोल विकत घेतले आणि त्या सर्वांवर तिने भावासाठी पत्र लिहिले. यासाठी कृष्णप्रियाला 12 तास लागले.