Porn Movies पाहून दर तासाला 1500 रुपये कमवते 22 वर्षीय Rebecca Dixon; काय आहे नेमकी प्रकरण? जाणून घ्या
कंपनीने तिला नोकरीची उत्तम ऑफर दिली आहे. रेबेकाला घरात बसूनच पॉर्न चित्रपट पहावे लागतात. त्याबदल्यात तिला दर तासाला 1500 रुपये दिले जातात.
Rebecca Dickson: सध्या सर्वांनाचं चांगली नोकरी हवी आहे. चांगल्या कंपनीत नोकरी मिळावी आणि चांगला पगार मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पॉर्न चित्रपट (Porn Movies) पाहण्यासाठी तरुणीला भरमसाठ रक्कम दिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुलीची ही आगळी-वेगळी नोकरी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. वास्तविक, या मुलीला घरी बसून पॉर्न चित्रपट पहावे लागतात आणि त्या बदल्यात तिला दर तासाला 20 पौंड म्हणजेच सुमारे 1500 रुपये दिले जात आहेत. नुकतेच एका वेबसाइटने एका मुलीला अशी नोकरी ऑफर केली की, जगभरात त्याची चर्चा होत आहे.
पॉर्न इंडस्ट्री हा जगातील सर्वात मोठा उद्योग आहे. यातून दरवर्षी सुमारे 3.78 अब्ज पौंडांची कमाई होते. त्याचा प्रचार आणि प्रसार वाढवण्यासाठी एका पॉर्न वेबसाइटने एक जाहिरात काढली, ज्यावर 90 हजारांहून अधिक लोकांनी अर्ज केला. पण नशीब चमकले 22 वर्षीय रेबेका डिक्सन हिचे. रेबेका डिक्सन (Rebecca Dickson) ही स्कॉटलंडची रहिवासी आहे. कंपनीने तिला नोकरीची उत्तम ऑफर दिली आहे. रेबेकाला घरात बसूनच पॉर्न चित्रपट पहावे लागतात. त्याबदल्यात तिला दर तासाला 1500 रुपये दिले जातात. (हेही वाचा - Aabha Paul Bold Video: आभा पॉलने ओलांडल्या बोल्डनेसच्या सीमा; 'गंदी बात' फेम अभिनेत्रीने चाहत्यांना घडवले नितंबांचे दर्शन, पहा व्हिडीओ)
रेबेका डिक्सन यांनी सांगितले की, ही नोकरी इतर नोकऱ्यांपेक्षा खूप वेगळी आहे. इथे मला पॉर्न फिल्म पाहण्यासाठी पैसे मिळतात. ही गोष्ट तिने घरच्यांना सांगितल्यावर त्यांचा विश्वासचं बसेना. तिच्या कामाबद्दल माहिती देताना तिने सांगितले की, मी सर्वाधिक पाहिलेले 100 पॉर्न व्हिडिओ पाहते. मग मी त्याचे आकडे काढते. माझे काम स्त्री-पुरुष गुणोत्तर, केसांचा रंग, भाषा इत्यादींची माहिती गोळा करणे आहे. मी नुकतीच 50 तासांची पॉर्न फिल्म पाहिली आहे. ज्यासाठी मला 755 पौंड (66,318 रुपये) दिले गेले.
दरम्यान, कंपनीने सांगितले की, या कामासाठी आम्हाला 90 हजार अर्ज आले होते. अर्जाची प्रक्रिया अगदी सरळ आणि सोपी होती. उमेदवारांना फक्त त्यांचा सीव्ही जोडायचा होता आणि काही प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. यात रेबेका डिक्सनची निवड झाली. कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की ती खूप मोकळ्या मनाची असून कंपनीला त्याचा फायदा होत आहे.