Yusuf Pathan: युसूफ पठाण बहरामपूरमधून निवडणुकीच्या मैदानात आघाडीवर, काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी पिछाडीवर

पश्चिम बंगालच्या बहरामपूरमधून युसूफ पठाण आघाडीवर आहे. काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी पिछाडीवर आहेत.

Photo Credit - X

Yusuf Pathan: पश्चिम बंगालमधील(West Bengal)बहरामपूर लोकसभा(Bahrampur) मतदारसंघात भारताचा माजी खेळाडू युसूफ पठाण त्याच नशिब लोतसभा निवडणूकीत आजमावत आहे. याता त्याला यश मिळत असल्याचं चित्र आहे. काँग्रेसचे उमेदवार अधीर रंजन चौधरी यांना मागे टाकत युसूफ पठाण हा आघाडीवर आहे. अत्यंत थोड्या फरकाने रंजन चौधरी पिछाडीवर आहे. दुपारी १ वाजेपर्यंत, युसूफ पठाणला मतमोजणीत 124267 मतं मिळाली आहेत. अधीर रंजन चौधरी यांना 118277 मतं मिळाली आहेत. (हेही वाचा:Lok Sabha Elections Result 2024: निकालापुर्वी कंगना रणौतने तिच्या निवासस्थानी केली प्रार्थना, मोठ्या फरकाने आघाडीवर (Watch Video) )

लोकसभा निवडणूक निकालाकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. भारतीय क्रिकेट संघासाठी क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या युसूफ पठाण(Yusuf Pathan)नं राजकारणाचं मैदानही गाजवत आहे. विशेष म्हणजे युसूफ पठाण समोर काँग्रेसचे लोकसभेतील गट नेते खासदार अधीर रंजन चौधरी(Adhir Ranjan Chowdhury)यांचं आव्हान आहे.

2009 च्या लोकसभा निवडणुकीपासून बहरामपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. अधीर रंजन चौधरी यांनी 2009 पासून या मतदारसंघात विजय मिळवला आहे. बहरामपूर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान पार पडलं होतं. अधीर रंजन चौधरी यांनी 2009 पासून या ठिकाणी सलग तीनवेळा विजय मिळवला आहे. तर,2019 च्या लोकसभा निवडणुकीत अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेसच्या अपूर्व सरकार यांना 80696 मतांन पराभूत केलं होतं. तर, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत टीएमसीच्या इंद्रनील सेन यांच्यावर अधीर रंजन चौधरींनी विजय मिळवला होता. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत अधीर रंजन चौधरी यांनी विजय मिळवत रिवॉल्युशनरी सोशालिस्ट पार्टी पक्षाकडून बहरामपूरची जागा आपल्याकडे घेतली होती.