Mumbai: अल्पवयीन मुलीची ओढणी खेचणे तरुणाला पडले महागात; विशेष न्यायालयाकडून 3 वर्षांचा कारावासाची शिक्षा

न्यायालयाने नमूद केले की, अशा घटनेमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होते. तसेच पीडिता आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांवर याचा दिर्घकाळ परिणाम होतो.

Mumbai: अल्पवयीन मुलीची ओढणी खेचणे तरुणाला पडले महागात; विशेष न्यायालयाकडून 3 वर्षांचा कारावासाची शिक्षा
Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Mumbai: मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पॉक्सो) कायदा, 2012 अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुंबईच्या विशेष न्यायालयाने एका 23 वर्षीय तरुणाला अल्पवयीन विद्यार्थिनीची ओढणी ओढल्याप्रकरणी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने नमूद केले की, अशा घटनेमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होते. तसेच पीडिता आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांवर याचा काळ परिणाम होतो. विशेष न्यायाधीश प्रिया बनकर यांनी मोहम्मद उर्फ ​​जैद गुलामनबी शेख याला पॉक्सो कायद्याच्या कलम 7 आणि 8 अंतर्गत दोषी ठरवले आणि तीन वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायाधीशांनी दोषीला 10,000 चा दंडही ठोठावला आहे.

न्यायाधीशांनी 11 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निकालात नमूद केले की, अल्पवीयन मुलींवरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. पीडित मुलीवर, तिच्या कुटुंबीयांवर आणि अगदी समाजावरही या घटनेचा खूप विपरीत परिणाम होतो. मुलींसाठी घर आणि आजूबाजूचा परिसर सुरक्षित नाही आणि त्यामुळे समाजात चिंताजनक परिस्थिती निर्माण होते. (हेही वाचा - Wardha Crime: धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून एका 50 वर्षीय इसमाचा महिलेवर अॅसिड हल्ला, रुग्णालयात उपचार सुरु)

फिर्यादीने सांगितलेल्या माहितीनुसार, माहीम येथे राहणारी पिडिता 1 डिसेंबर 2017 रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घराजवळील दुकानाकडे जात असताना आरोपीने तेथे येऊन तिचा हात पकडून ओढणी खेचली. यावेळी मुलीने आरडाओरड करत घडलेला प्रकार वडिलांना सांगणार असल्याचे सांगितले. त्यावर आरोपीने तिला धमकी दिली. या प्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, आयपीसीच्या कलम 354(ए), (बी), 504, 506 आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 12 अंतर्गत मोहम्मदविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. शिक्षेत सवलत मिळावी म्हणून बचाव पक्षाच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, आरोपींना गुन्हेगारी पूर्ववृत्त नाही. तो त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य आहे आणि तो 23 वर्षांचा आहे. त्यामुळे आरोपीला शिक्षा सुनावताना नम्रता दाखवण्यात यावी. तसेच किमान शिक्षा ठोठावण्यात यावी. मात्र, न्यायालयाने आरोपीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2022 12:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).