Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुसाईट नोट लिहून तरूणाची आत्महत्या, हिंगोलीतील घटना

मराठवाड्यात आणखी एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुसाईट नोट लिहून तरूणाची आत्महत्या, हिंगोलीतील घटना
Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

Maratha Reservation: मराठवाड्यात आणखी एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आयुष्य संपवले आहे. अहवालानुसार गेल्या महिन्याभरापासून तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. हिंगोलीत एका उच्च शिक्षित तरूणाने विजेच्या तारांना पकडून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईट नोट लिहली ज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीचा उल्लेख केला होता.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात तरूणाने आरक्षण मिळत नसल्याने आपली जीवनयात्रा संपवली. तरूणाने घरातचं चिठ्ठी लिहून विजेच्या तारांना पडकून आत्महत्या केली. सुसाईट नोटमध्ये लिहल्याप्रमाणे, मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे का ? असा उल्लेख करत त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. आदिनाछ राखोंडे ( 27)असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. हिंगोली जिल्ह्यातील आजरसोंडा येथील रहिवासी होता. त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. आत्महत्याचे सत्र काही संपेनाचं, त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

एक मराठा लाख मराठा...मी सतत बातम्या पाहत आहे व मला असे वाटत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. माझे उच्च शिक्षण होऊनसुद्धा मला नोकरी मिळत नाही. माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. त्यामुळे माझा मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा झाला आहे का? मी हतबल होऊन आज रात्री माझे जीवन संपवत आहे. असं तरुणाने सुसाईट नोट मध्ये लिहले होते. माध्यामांना मिळालेल्या माहितीनुसार,  मनोज जरांगे १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर पर्यंत राज्य दौरा करणार आहे.ज्यात आरक्षणासाठी तरुणांना आत्महत्या करू नका असं आव्हाहन करणार आहे. 

(The above story first appeared on LatestLY on Nov 09, 2023 01:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).